Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

राज्यातील पोलिस अधिकारी, अंमलदारांना विशेष सेवा पदक जाहीरमुंबईच्या डीसीपी वैशाली शिंदे, साताऱ्याचे अधीक्षक समीर शेख, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, एपीआय रोहित चौधरी यांचा समावेशसांगली जिल्ह्यातील चार अधिकाऱ्यांचा समावेश

राज्यातील पोलिस अधिकारी, अंमलदारांना विशेष सेवा पदक जाहीर मुंबईच्या डीसीपी वैशाली शिंदे, साताऱ्याचे अधीक्षक समीर शेख, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, एपीआय रोहित चौधरी यांचा समावेश सांगली जिल्ह्यातील चार अधिकाऱ्यांचा समावेश


मुंबई :स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अधिकारी, अंमलदारांना विशेष सेवा पदक जाहीर केले आहे. पदक जाहीर झालेल्यांमध्ये मुंबई सशस्त्र पोलिस दल, वरळीच्या डीसीपी वैशाली शिंदे, साताऱ्याचे अधीक्षक समीर शेख, मिरजेचे उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, अमरावतीचे एपीआय रोहित चौधरी आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर सांगली जिल्ह्यातील एकूण चार अधिकाऱ्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.  
 
पदक जाहीर झालेल्या सांगली जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची नावे : उपनिरीक्षक सुजाता भोपाले, विनायक मसाळे, जीवन कांबळे. अधिकाऱ्यांची नावे : पोलिस निरीक्षक बबन आव्हाड (कोल्हापूर परिक्षेत्र), महादेव तोंदले (कोल्हापूर परिक्षेत्र), सहायक निरीक्षक पोपट टिळेकर, जनार्धन हेगडकर (कोल्हापूर परिक्षेत्र), उपनिरीक्षक शीतल माने, युनूस जमादार, प्रवीण माने, शीतल धाविले, नागेश खैरमोडे, हर्षल बागल (सर्व कोल्हापूर), उपनिरीक्षक राजीव केंद्रे, पांडुरंग मुंडे, जीवन पाटील, संतोष यादव, इम्रान मुल्ला, अझहर शेख, महेश पवार (सर्व कोल्हापूर परिक्षेत्र).

सातारा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची नावे : उपनिरीक्षक पारितोष दातीर, तेजस्विनी देशमुख, सचिन भिलारी, अविनाश गवळी, मच्छिंद्रनाथ पाटील, प्रिया पाटील, भा. रा. ब. ३ कोल्हापूरच्या १४ अंमलदारांनाही हे विशेष सेवा पदक जाहीर करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.