Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

' छगन भुजबळ जिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार ', मनोज जरांगेचं विधान

' छगन भुजबळ जिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार ', मनोज जरांगेचं विधान
 
 

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण  मिळावं यासाठी आणि अन्य काही मागण्यांसाठी लढा उभारलेले मनोज जरांगे-पाटील यांनी आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. यासाठी ते राज्यभरात दौरे, शांतता रॅली करत आहेत. सोलापूरमध्ये बोलताना मनोज जरांगेंनी पुन्हा एकदा अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांना लक्ष्य केलं.

छगन भुजबळ यांना जो नेता प्रचाराला घेऊन जाईल, त्याचा उमेदवार पाडायचा, असं विधान मनोज जरांगेंनी शांतता रॅलीत केलं होतं. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार  यांना प्रश्न विचारण्यात आला. छगन भुजबळ जिथं प्रचाराला जातील ती जागा आम्ही पाडणार, असं मनोज जरांगेंनी म्हटलं आहे. यावर अजित पवारांनी 'नो कमेंट्स...', असं उत्तर दिलं. 

महायुतीच्या यात्रेवर अजित पवार काय म्हणाले?

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत नुकतीच एक बैठक पार पडली. रात्री दीड वाजेपर्यंत ही बैठक चालली. गाव खेड्यातील महायुतीचा कार्यकर्त्यांचा समनव्य रहावा यासाठी 6 विभाग आणि मुंबई एक वेगळा विभाग या 7 विभागात आमचे एकत्रित मेळावे पार पडणार आहेत. मुख्यमंत्,री दोन्ही उपमुख्यमंत्री या मेळाव्याला हजर असतील. 17 तारखेला आम्ही पुण्यात एक कार्यक्रम घेतोय. त्याच कार्यक्रमात महिलांना खात्यावर पैसे जमा होतील. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात मेळावे पार पडणार आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.