Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड :, गुप्ता यांच्या अडचणी वाढणार

Breaking news! सांगलीचे आयुक्त शुभम गुप्ता यांचा कोट्यवधींचा भ्रष्टाचार उघड :, गुप्ता यांच्या अडचणी वाढणार 
 
मुंबई : पूजा खेडकर प्रकरण ताजं असतानाच आता आणखी एका आयएएस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना एक मोठा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. या घोटाळ्याचा संपूर्ण कच्चा चिठ्ठा एबीपी माझाच्या हाती लागला आहे.

सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते. या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गायी म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली. या योजनेत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचं उघड झालं आहे. सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालात हे तपशीलवार नमूद करण्यात आलं आहे.
 
लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतःच वळवून घेणं, लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशूवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता  यांनी केल्याचं सिद्ध झालं आहे.

पुण्यातील पूजा खेडकर  प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यासह देशभरात खळबळ माजली होती. पूजा खेडकर प्रकरण ताजं असताना आणखी एका आयएएस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना मोठा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. या घोटाळ्याचा संपूर्ण तपशील एबीपी माझाच्या हाती लागला आहे. हा घोटाळा नेमका कसा केला? कुठल्या थराला जाऊन गैरप्रकार केले? हे ऐकल्यावर तुम्ही देखील चक्रावून जाल. पूजा खेडकर प्रकरणी अद्याप नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आणखी एका आयएएस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना केलेला घोटाळा समोर आल्यानं खळबळ माजली आहे.

नेमका घोटाळा काय?

सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते. या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गायी-म्हशी वाटपाची एक योजना चालवली जाते. या योजनेचे गुप्ता हे प्रकल्प अधिकारी होते. योजनेत त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांवर डल्ला मारल्याचा ठपका सरकारनं ठेवला आहे. लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे पाठवणं, मग ते पैसे स्वतःच दुसऱ्या खात्यात वळवून घेणं, त्यासाठी लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामं करण्यासाठी स्वतःच्या विभागातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या सह्या जोडणं, असे अनेक गैरप्रकार गुप्ता यांनी केल्याचं सिद्ध झालं आहे. शासनाच्या समितीच्या अहवालात हे तपशीलवार नमूद करण्यात आलं आहे, आणि हा अहवाल राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. त्याचं इंग्रजी भाषांतर करून केंद्र सरकारकडे कारवाईची मागणी करण्यात येणार आहे.
सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते. या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गायी म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आली. या योजनेत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशांचा मोठा अपहार केल्याचं उघड झालं आहे. सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालात हे तपशीलवार नमूद करण्यात आलं आहे.

लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतःच वळवून घेणं, लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावणं, बोगस पशूवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता  यांनी केल्याचं सिद्ध झालं आहे.

पुण्यातील पूजा खेडकर  प्रकरण समोर आल्यानंतर संपूर्ण राज्यासह देशभरात खळबळ माजली होती. पूजा खेडकर प्रकरण ताजं असताना आणखी एका आयएएस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना मोठा घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. या घोटाळ्याचा संपूर्ण तपशील एबीपी माझाच्या हाती लागला आहे. हा घोटाळा नेमका कसा केला? कुठल्या थराला जाऊन गैरप्रकार केले? हे ऐकल्यावर तुम्ही देखील चक्रावून जाल. पूजा खेडकर प्रकरणी अद्याप नवनवीन खुलासे होत आहेत. अशातच आणखी एका आयएएस अधिकाऱ्यानं प्रशिक्षणार्थी असताना केलेला घोटाळा समोर आल्यानं खळबळ माजली आहे.

सौजन्य ABP माझा

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.