Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काय आहे सेंट मार्टिन बेटाचं महत्व? ज्यामुळे अमेरिकेने बांगला देशात दंगली उसळवून सत्ता पालट केल्याचा होतोय आरोप

काय आहे सेंट मार्टिन बेटाचं महत्व? ज्यामुळे अमेरिकेने बांगला देशात दंगली उसळवून सत्ता पालट केल्याचा होतोय आरोप
 
 
 
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी सेंट मार्टिन बेटाच्या संदर्भात अमेरिकेवर केलेल्या आरोपानंतर समुद्राने वेढलेलेले असलेले अवघ्या ३ किलोमीटरची लांबीचे बेट सध्या जगात चर्चेचा विषय बनला आहे.

सामरीक दृष्ट्या हे छोटे बेट इतके महत्त्वाचे का आहे, ते अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला ते देण्यास नकार दिल्याने बांगलादेशमध्ये हिंसाचार उसळून शेख हसिना यांना राजीनामा देऊन देशातून पळ काढवा लागला. या सर्व हिंसचारामागे अमेरिकचा हात असल्याचं शेख हसिना यांनी जाहीर पणे म्हटले आहे.

महत्त्वपूर्ण व्यापारी जलमार्ग

सेंट मार्टिन बेटावर जगातील कोणत्याही सागरी मार्गाने सहज जाता येते. सामरिक दृष्टिकोनातून या बेटावरून बंगालचा उपसागर आणि आजूबाजूच्या संपूर्ण सागरी भागावर सहज नजर ठेवता येते. बंगालचा उपसागर दक्षिण आणि आग्नेय आशिया दरम्यान हा महत्वाचा सागरी वाहतुकीचा मार्ग ओळखला जातो. व्यापार मार्गांद्वारे जगभरातील देशांशी संपर्क प्रस्थापित करण्यासाठी हे बेट सोयीचे आहे.

भारत आणि चीनवर ठेवता येणार नजर
सेंट मार्टिन बेट हे बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात एक छोटेसे बेट आहे. आशिया खंडात अचानक युद्ध झाल्यास या भागाशी संपर्क प्रस्थापित करणे सोपे जाईल. हे बेट भारत आणि चीनच्या अगदी जवळ आहे. या बेटाच्या माध्यमातून भारत आणि चीन या दोन मोठ्या आर्थिक शक्तींवर अमेरिका नजर ठेवू शकणार आहे. तसेच या संपूर्ण क्षेत्रातील व्यापारावर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असेल. चीनच्या विस्तारवादी धोरणालाही तो इथूनच रोखू शकेल.

- अमेरिकेला या बेटावर हवाई तळ बनवायचा आहे, ज्यामुळे ते बंगालच्या उपसागरात आणि हिंदी महासागरात आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकेल.

- जैवविविधता, पर्यावरण, पर्यटन यांसह अनेक कारणांसाठी हे बेट महत्त्वाचे आहे.
सेंट मार्टिन बेटाचा इतिहास

सेंट मार्टिन बेट हे बंगालच्या उपसागराच्या ईशान्य भागात एक लहान बेट आहे. हे कॉक्स बाजार-टेकनाफ द्वीपकल्पाच्या टोकाच्या दक्षिणेस सुमारे ९ किमी अंतरावर आहे. हे बांगलादेशचे शेवटचे दक्षिणेकडील टोक आहे. हजारो वर्षांपूर्वी हे बेट टेकनाफ द्वीपकल्पाचा भाग होते. टेकनाफ द्वीपकल्पाचा काही भाग पाण्याखाली गेल्यामुळे, त्याचा दक्षिणेकडील भाग बांगलादेशच्या मुख्य भूमीपासून वेगळा झाला आणि एक बेट बनले.

हे बेट १८ व्या शतकात अरब व्यापाऱ्यांनी प्रथम वसवले होते. त्याचे नाव त्यांनी 'जझीरा' ठेवले. ब्रिटिश राजवटीत चितगावच्या तत्कालीन उपायुक्तांच्या नावावरून या बेटाला सेंट मार्टिन बेट असे नाव देण्यात आले.

- स्थानिक लोक या बेटाला बंगाली भाषेत 'नारिकेल जिंजिरा' म्हणतात, ज्याचा इंग्रजीत अर्थ 'कोकोनट आयलंड' असा होतो.

- बांगलादेशातील हे एकमेव कोरल बेट (मुंगा बेट) आहे.

काय म्हणाल्या शेख हसीना

रविवारी शेख हसीनाने या बेटावरून थेट अमेरिकेला लक्ष्य केलं आहे. सेंट मार्टिन या मोक्याच्या बेट अमेरिकेला देण्यास नकार दिल्याने अमेरिकेने बांगलादेशात दंगली घडवल्या असा आरोप त्यांनी केला आहे. 'द इकॉनॉमिक टाईम्स'ला त्यांनी पत्राद्वारे दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे. हसिना म्हणाल्या 'जर मी सेंट मार्टिन बेट अमेरिकेला देण्यास तयार झाले असते तर या दंगली झाल्याच नसत्या. जर मी अमेरिकेला बंगालच्या उपसागरातील हे महत्वाचे बेट देण्यास तयार झाले असते तर मी सत्तेत राहू शकले असते, असे हसिना यांनी म्हटलं आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.