मित्राची हत्या केली, मृतदेहासमोरच बॉयफ्रेंडसह सेक्स, त्यानंतर ३०० तुकडे
केले अन्.; सुप्रसिद्ध अभिनेत्रीची विकृती, नेमकं काय घडलं?
ही वर्षापूर्वी सिनेसृष्टीला हादरवून सोडणारे हत्याकांड देशात घडून आले. टेलिव्हिजन एक्झिक्युटीव्ह नीरज ग्रोव्हरच्या हत्याप्रकरणाला १५ वर्ष उलटून गेली. यामध्ये मैसूरची अभिनेत्री स्टारलेट मारिया मोनिका सुसाईराज आरोपी होती.
या खुनाचा तपास झाल्यानंतर मारियाला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आणि नंतर तिची सुटकादेखील झाली. आता इतक्या वर्षानंतर मारिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता ती फसवणूक, बनावटगिरी व धमकी देणे अशा अनेक गुन्ह्यामध्ये मुंबई व ठाणे पोलिस स्थानकात तक्रार झाली असून ती फरार आहे.
दरम्यान २००८ साली ती एका हत्याकांडामुळे चर्चेत आली होती. या हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. मारिया व सूरजची ओळख ऑडिशनच्या दरम्यान झाली होती. त्यावेळी नीरज मुंबईमध्ये व्यवस्थित रमला होता. त्याने अनेक मोठ्या कार्यक्रमांमध्ये काम केले होते. २००८ साली तो एकता कपूरच्या बालाजी टेलिफिल्ममध्ये काम करत होता. मारिया मात्र त्यावेळी नवीन होती. तिने निरजकडे मदत मागितली. याआधी मारिया मैसुरमधील जेरोम बरोबर रिलेशनशिपमध्ये होती. पण जेव्हा मारिया मुंबईमध्ये आली तेव्हा ती नीरजकडे राहू लागली. तिला कामामध्ये नीरज सर्वतोपरी मदत करु लागला.
दरम्यान काही दिवसांनंतर नीरज गायब झाल्याचे समोर आले. त्याचा सगळीकडे तपास सुरु झाला. पण हाती काही लाले नाही. पण काही दिवसांतच पोलिसांनी पुन्हा एकदा तपासाचा वेग वाढवला आणि नीरजबद्दल धक्कादायक माहिती समोर आली. या सगळ्यामध्ये मारियाचे नाव समोर आले. सुरुवातीला गुन्हा कबूल न करणाऱ्या मारियाने तिचा गुन्हा कबूल केला. ८ मे रोजी तिने व तिचा बॉयफ्रेंड जेरोमने नीरजची हत्या केल्याचे कबूल केले.समोर आलेल्या माहितीनुसार, जेरोमने रागाच्या भरात नीरजवर धारधार चाकूने वार केले. नीरजवर वार झाल्यानंतर तो मृत्यूमुखी पडला. त्यानंतर मारियाने खोली साफ करण्यास सुरुवात केली. त्याचा मृतदेह त्याच खोलीमध्ये होता. तेव्हा त्या मृतदेहाच्या समोरच मारिया व जेरोम यांनी शारीरिक संबंध केले. त्यानंतर दोघंही बाहेर गेले आणि पिशव्या व चाकू घेऊन परतले. त्यांनी मृतदेहाचे तीनशे तुकडे केले. त्यानंतर संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास अमगांवकडे रवाना झाले. त्यांनी वाटेत पेट्रोल खरेदी केले आणि शांत ठिकाणी जाऊन मृतदेह जाळला. मात्र नीरजला आलेला एक कॉल मारियाकडून उचलला गेल्याने पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यास मदत झाली.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.