Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

'या' दिवशी चुकूनही कापू नका नखं, तुमचे वाईट दिवस सुरू होऊ शकतात

'या' दिवशी चुकूनही कापू नका नखं, तुमचे वाईट दिवस सुरू होऊ शकतात
 

आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकांना वेळ मिळतो तसा ते स्वतःचे ग्रूमिंग करतात. यामध्ये अनेक लोक नखं देखील कापतात. मात्र योग्य दिवशी नखं कापणे महत्त्वाचे असते. नाहीतर जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

नेहमी लक्षात असू द्या की, उपवासाला चुकूनही नखं कापू नये. तसेच अमावस्येला देखील नखं कापणे टाळावे. चला तर मग हिंदू धर्मात ज्योतिष शास्त्रानुसार, नखे कापण्याचा योग्य दिवस जाणून घेऊयात.

कोणत्या दिवशी नखं कापू नये?

मंगळवार

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळवार नखं कापल्यास शरीरात रक्ताशी संबंधित आजार उद्भवतात. डोक्यावरील कर्ज वाढते.

गुरुवार

गुरुवारी नखं काढू नये. यामुळे नात्यामध्ये कटुता येते. तसेच हा भगवान विष्णूचा वार असल्यामुळे नखं कापणे टाळावे.

शनिवार

शनिवार हा अशुभ दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी कोणतीही चांगली कामे करू नये. नखं कापल्यामुळे आपल्या शरीरातील घाण निघून जाते. म्हणून शनिवारी चुकूनही नखं कापू नये. यामुळे सांधेदुखी आणि पाठदुखीचा त्रास वाढतो. तसेच अचानक आजारपण येऊ शकते. शनिवारी नखं कापल्यास शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव आपल्यावर पडतो.

कोणत्या दिवशी नखे कापावी?

रविवार

रविवारी सुट्टी असल्यामुळे अनेक लोक रविवारी स्वतःचे ग्रूमिंग करतात. यात बरेच लोक नखं देखील कापतात. जे की योग्य आहे. रविवारी नखं कापल्यामुळे आर्थिक लाभ होतो.

सोमवार

हिंदू धर्मात सोमवार हा दिवस भगवान शंकराचा असल्यामुळे या दिवशी नखं कापणे शुभ मानले जाते. या दिवशी नखं कापल्यास व्यक्तीतील वाईट गुण दूर होतात. घरातील आर्थिक स्थिती मजबूत होते.

बुधवार

ज्योतिष शास्त्रानुसार,बुधवार नखं काढण्यासाठी उत्तम दिवस मानला जातो. या दिवशी नखं काढल्यामुळे घरात सुख-शांती लाभते. तसेच करिअरमध्ये प्रगती होऊन धन-दौलत लाभते.

शुक्रवार

शुक्रवार हा सौंदर्याचा दिवस मानला जातो. त्यामुळे या दिवशी शरीराची स्वच्छता आवर्जून करावी. या दिवशी नखं कापणे शुभ मानले जाते. या दिवशी नखं कापल्यामुळे चांगली बातमी मिळू शकते. नातेसंबंधात गोडवा वाढतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.