तर लाडकी बहीण योजना बंद होणार, अजित पवार स्पष्टच बोलले
आगामी विधानसभा निवडणुकापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस जन सन्मान यात्रेचे आयोजन केले आहे. आज या यात्रेदरम्यान आंबेगाव येथे बोलताना विधानसभा निवडणुकीनंतर देखील लाडकी बहीण योजना सुरु रहाणार असल्याची ग्वाही दिली.
या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, आम्ही काम करणारे माणसे आहे, बंद करणारे नाही. आम्ही योजना पुढे नेणारी माणसे आहे. दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांना विचारा 1999 आणि 2004 चा काळ. निवडणुकीपूर्वी वीज माफी करण्याचा निर्णय शिंदे साहेबांच्या सरकारने घेतला होता ते मुख्यमंत्री होते आणि नंतर सरकार आलं मी म्हणालो, योजना पुढे चालू ठेव्याची तर त्यांनी आम्हाला सांगितले, निवडणूक झाली आपलं भागलं आता योजना बंद. असलं माझ्याकडून होणार नाही. हे मी महाराष्ट्राला सांगतोय. महायुतीतसं करणार नाही.
तसेच ही योजना बंद करायची की सुरु ठेवायची हे तुमच्या हातात आहे. तुम्ही जर लोकसभेसारखा दणका दिला तर योजना बंद होईल जर तुम्ही महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा दिला तर ही योजना सुरु रहाणार असं अजित पवार म्हणाले.तर सभेत बोलताना अजित पवार पुढे म्हणाले की, विरोधकांना काही काम नाही. ते आमच्यावर खोटे आरोप करत आहे. आमच्याकडून मागच्या वेळी काही गोष्टी चुकल्या ते आम्ही कबूल केल्या आहे. आता कांद्याला बरा भाव आहे. टोमॅटोला बरा भाव आहे.आता आम्ही त्यांना सांगितले आहे की, अजिबात कांदा निर्यात बंदी करायची नाही. त्यामुळे आता कांदा निर्यातबंदी होणार नाही. असेही यावेळी अजित पवार म्हणाले. जनतेचा सम्मान करण्यासाठी आम्ही जन सन्मान यात्रेचे आयोजन केले आहे असं देखील यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.