महाराष्ट्रात आणखी एका 'काका'ला धक्का बसणार? पुतण्या शरद पवारांच्या भेटीला
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एका काका-पुतण्यामधली लढाई पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यांमधल्या लढतीनंतर बारामतीमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार असा काका-पुतण्यांमधला सामना रंगण्याची शक्यता आहे.
त्यातच माढ्यामध्येही काका विरोधात पुतण्या बंड करण्याच्या तयारीमध्ये आहे. आमदार बबन शिंदे यांच्या पुतण्याने शरद पवारांची भेट घेतली आहे. धनराज शिंदे हे शरद पवारांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे.आमदार बबन शिंदे यांना शरद पवारांची राष्ट्रवादी विरोध करत असताना दुसरीकडे बबन शिंदे यांच्या पुतण्याने शरद पवारांची बेट घेतली आहे. बबन शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आमदार बबन शिंदे यांना आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं आहे, पण आता थेट पुतण्यानेच काकाला आव्हान देण्याची तयारी दाखवली आहे, त्यामुळे आता माढा मतदारसंघात काका विरुद्ध पुतण्या यांच्यात सामना पाहायला मिळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या सगळ्यामध्ये लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीतही माढा मतदारसंघ चांगलाच चर्चेत येत आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.