Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

चीनच्या गर्मीत गाड्या होतायेत प्रेग्नंट, लोक वैतगले

चीनच्या गर्मीत गाड्या होतायेत प्रेग्नंट, लोक वैतगले 

  

भारतामध्ये मान्सूनचा पाऊस कोसळत आहे. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या शेजारी असलेल्या चीनमध्ये सध्या याच्या उलट परिस्थिती आहे. तिथली जनता उष्णतेने हैराण झाली आहे.

चीनमध्ये सुमारे 80 दिवसांपासून सतत उष्णतेची लाट सुरू आहे. त्यामुळे 260 हून अधिक भागांतलं तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त नोंदवलं गेलं आहे. या कालावधीतल्या एका घटनेने साऱ्या जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे. उष्णतेमुळे चायनीज गाड्यांवर वाढलेल्या पोटाप्रमाणे फुगा येत आहेत. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि होत आहेत.

लोक अशा गाड्यांना गमतीने 'प्रेग्नंट कार' म्हणत आहेत. कारवर लावलेल्या पेंट प्रोटेक्टिव्ह फिल्ममुळे गाड्यांवर फुगा तयार होत आहे. प्रचंड उष्णतेमुळे ही पेंट प्रोटेक्टिव्ह फिल्म धातूच्या पृष्ठभागापासून वेगळी होत आहे. परिणामी, कारचं बॉनेट, दरवाजे आणि मागच्या डिक्कीवर फुग्यासारखे आकार दिसू लागले आहेत. हे दृश्य पाहून जगभरातील लोक आश्चर्यचकित झाले आहेत.
कारवर लावलेल्या पेंट प्रोटेक्शन फिल्मची देखील तापमान सहन करण्याची एक मर्यादा असते. जर तापमान तिच्या क्षमतेपेक्षा जास्त वाढलं तर गाडीवर अशा प्रकारे फुगे येऊ शकतात. सध्या ट्विटरवर म्हणजेच X वर असे अनेक व्हिडिओ पोस्ट केले जात आहेत. या व्हिडिओजमध्ये फुगलेल्या गाड्या दिसत आहेत. विशेष म्हणजे, चायनीज गाड्याच नाही, तर जर्मन बनावटीच्या गाड्यांवरदेखील फुगे आले आहेत. यामुळे चीनच्या बाजारात बनावट कार पेंट प्रोटेक्शन फिल्मबाबत चर्चा रंगली आहे.

चीनमध्ये भीषण उष्णतेमुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शेकडो जण आजारी आहेत. आठ दिवसांपासून पूर्व किनारपट्टीवर उष्णतेची लाट आहे. यांगत्से नदीची (ब्रह्मपुत्रा नदी) दक्षिणेकडची पाणीपातळी गेल्या तीन दिवसांपासून लक्षणीयरीत्या खाली गेली आहे. शांघायमधलं तापमान 37 ते 39 अंश सेल्सिअसवर आहे. अनहुई, जिआंगसू आणि झेजियांगमध्ये पारा 40 अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे.
चीनमध्ये जुलै महिन्यात भयंकर उष्णतेची नोंद झाली. 3 ऑगस्ट रोजी हांगझोऊमध्ये पारा विक्रमी 41.9 अंश सेल्सिअसवर होता. मृत्युमुखी पडलेल्या व्यक्ती 50 ते 60 वयोगटातल्या होत्या. 1961नंतरची ही चीनमधली सर्वांत धोकादायक अशी उष्णतेची लाट आहे. यापूर्वी 2022मध्येसुद्धा अशी भीषण उष्णता होती. 13 जूनपासून आजपर्यंत चीनमध्ये उष्णतेची लाट टिकून आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.