Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

विद्येचं माहेरघर हादरलं.! वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या १२ वर्षीय मुलावर महाराजाकडून बलात्कार; आळंदीतील घटनेने खळबळ

विद्येचं माहेरघर हादरलं.! वारकरी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या १२ वर्षीय मुलावर महाराजाकडून बलात्कार; आळंदीतील घटनेने खळबळ
 

आळंदी : विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील आळंदीत वारकरी शिक्षण एका महाराजाने आपल्याच खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेलया बारा वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही घटना १७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे. आळंदी पोलिसांनी वारकरी संस्थेतील महाराजाला अटक केली आहे. व्यकंटेश काशिनाथ माडनूर असे अटक करण्यात आलेल्या महाराजाचे नाव आहे.

याबाबत आधिक माहिती अशी कि, माडनूर मधील आळंदीत एक अन्नदान संस्था आहे. या संस्थेमध्ये बारा वर्षाचा अल्पवयीन मुलगा वारकरी शिक्षण घेत आहे. तो शनिवारी पहाटे झोपलेलया अवस्थेत त्या महाराजानी त्याला उचलून टीव्ही असणाऱ्या खोलीत नेले. तसेच त्याला मोबाईल खेळायला देत त्याच्यावर अनैसर्गिक रित्या बलात्कार केला. याला मुलाने विरोध केला तरी देखील महाराजांनी ऐकले नाही. आणि त्याला गप्प करत शांतपणे सर्व सहन करावे लागले असे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, महाराजावर बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.