Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कर्मवीर पतसंस्थेतर्फे श्री. भालचंद्र पाटील यांचा सत्कार संपन्न

कर्मवीर पतसंस्थेतर्फे श्री. भालचंद्र पाटील यांचा सत्कार संपन्न
 

सांगली :- दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदाची माळ अगदी अनपेक्षितपणे माझ्या गळयात पडली. खरे तर या पदावर काम करण्याची संधी मला मिळेल असे कधी वाटले ही नव्हते. पण रावसाहेब पाटील यांच्या सारखे मित्र भेटले आणि त्यांच्यामुळेच मला कामाचे प्रोत्साहन मिळाले. तुम्ही काम करा आम्ही सोबत आहोत ही भावना त्यांनी माझ्यामध्ये निर्माण केली व प्रत्येक ठिकाण कामाची संधी दिली. माझ्यावर दिलेल्या जबाबदारीला मी पुर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. समाजातील तरुण वर्गाला शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रात येण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याची भावना दक्षिण भारत जैन सभेचे नुतन अध्यक्ष श्री. भालचंद्र विरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. दक्षिण भारत जैन सभेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कर्मवीर पतसंस्था सांगली यांच्यावतीने त्याचा शॉल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला, सत्काराला उत्तर देताना त्यांनी ही भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाचे स्वागत कर्मवीर पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल श्रीपाल मगदुम यांनी केले. या प्रसंगी बोलताना कर्मवीर पतसंस्थेचे चेअरमन तसेच दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्री. रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी भालचंद्र पाटील यांच्याकडे विधायक काम पुढे नेण्याची ताकद आहे. आम्ही बरेच वर्षे एकत्र काम करुन अनेक कामाला मुर्त स्वरुप दिले आहे. दक्षिण भारत जैन सभेचे काम समाजाभिमुक करुन सर्वसमावेशक केले आहे व समाजाच्या प्रश्नाना सामाजिक व राजकीय पातळीवर न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. तीच परंपरा भालचंद्र पाटील आणखी पुढे घेऊन जातील अशी भावना व्यक्त करुन श्री. भालचंद्र पाटील यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कर्मवीर पतसंस्थेचे संचालक अॅड. एस. पी. मगदुम यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास संस्थेचे संचालक डॉ. रमेश वसंतराव ढबू. श्री. वसंतराव धुळाप्पाण्णा नवले, श्री. ओ. के. चौगुले (नाना) डॉ. एस.बी. पाटील (मोटके) डॉ. चेतन आप्पासाहेब पाटील, संचालिका श्रीमती भारती आप्पासाहेब चोपडे, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र आनंदा खाडे, श्री. लालासाहेब भाऊसाहेब थोटे उपस्थित होते. आभार संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉ. अशोक आण्णा सकळे यांनी मानले.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.