अंत्यन्त क्रूरता!महिला डॉक्टर बरोबर जें घडलं, त्याने सगळेच हदरले :, मेडिकल क्षेत्रात खळबळ
आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये एका ट्रेनी डॉक्टरसोबत अत्यंत भयानक घटना घडली आहे. महिला डॉक्टरवर अत्यंत क्रूर, अमानवीय अत्याचार करण्यात आले. महिला डॉक्टरसोबत जे झालं, त्याने सगळ्यानाच हादरवून सोडलय.
महिला डॉक्टरवर आधी बलात्कार करण्यात आला. त्यानंतर अत्यंत निदर्यतेने तिची हत्या करण्यात आली. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणात बलात्काराचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. महिला डॉक्टर मेडीकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये बेशुद्धा अवस्थेत सापडली होती. तात्काळ तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टर तिला वाचवू शकले नाहीत. पोलिसांनी शुक्रवारी या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर एक अटक केली. स्थानिक पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे.
शरीरावर कुठे-कुठे जखमा
ती ट्रेनी डॉक्टर सेकंड ईयरची विद्यार्थिनी होती. शुक्रवारी बेशुद्धवस्थेत सेमिनार हॉलमध्ये सापडली. तिला तात्काळ रुग्णालयात नेलं. पण तपासल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केलं. पोलिसांनी मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठवला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी बंगाल पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली आहे. शव विच्छेदनातून लैंगिक छळ आणि त्यानंतर हत्या झाल्याच समोर आलं आहे. पीडितेचे दोन्ही डोळे आणि तोंडातून रक्त येतं होतं. चेहरा आणि नखांवर जखमा होत्या. पीडितेच्या प्रायवेट पार्टवर सुद्धा जखमा झालेल्या. पोट, गळा, ओठ आणि उजव्या हातावर जखमा आहेत.
रुग्णालय व्यवस्थापनाची भूमिका संशयास्पद
रुग्णालय व्यवस्थापनाची भूमिका संशयास्पद आहे. मुलीने जीवन संपवून घेतल्याची आम्हाला माहिती देण्यात आली होती, असा मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे. रुग्णालयाला हे प्रकरण दाबायच आहे, असा नातेवाईकांचा आरोप आहे. महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर आरजी कर मेडीकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गदारोळ केला. चिडलेले डॉक्टर संपावर गेले आहेत. सकाळी 3 ते 6 च्या दरम्यान ही घटना घडल्याची माहिती पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. प्रत्यक्षदर्शींची जबानी पोलिसांनी नोंदवून घेतली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.