खुर्ची वाचवण्यासाठी महायुती सरकार चंद्रही आणून देतो म्हणेल! जयंत पाटील यांचा टोला
महायुती सरकारला आता खुर्चीची चिंता सतावतेय. जनतेने चंद्र मागितला तर खुर्ची वाचवण्यासाठी सरकार दोन महिन्यांत चंद्रही आणून देतो म्हणेल, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज लगावला.
सरकार राज्याच्या तिजोरीची कशी उधळपट्टी करतेय यावर जयंत पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले की, पृथ्वीपासून चंद्रापर्यंतचे अंतर सुमारे 3 लाख 85 हजार किलोमीटर आहे. इस्रोच्या शास्त्रज्ञांना चंद्रावर चांद्रयान पाठवायला फक्त 600 कोटी रुपये खर्च आला आणि महायुती सरकार अलिबागहून विरारला जायला 96 किमीच्या रस्त्यासाठी 26 हजार कोटी रुपये खर्च करतेय, असे सांगतानाच, प्रचंड मोठी पंत्राटे काढून मलिदा खाण्यावरच विद्यमान सरकारचा भर आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.
दादांनी यापूर्वी न बघताच फाईलवर सह्या केल्या
जयंत पाटील यांनी यावेळी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. शिंदे-फडणवीस कुठेही सह्या घेतात हे लक्षात आल्याने अजित पवार आता बघितल्याशिवाय फाईलवर सही करणार नाही, असे म्हणत आहेत. म्हणजे यापूर्वी त्यांनी न बघताच सह्या केल्या असा त्याचा अर्थ होतो, असा चिमटा जयंत पाटील यांनी काढला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.