' आमची मुलं आजीकडे राहतील :, आमचा कुणावर विश्वास नाही ' आई - बापाचे शेवटचे शब्द आणि.....
मुंबई : बायकोसोबत सेल्फी घेऊन नदीत उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्जाच्या विळख्यामध्ये अडकलेल्या ज्वेलर शॉपच्या मालकाने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये साई ज्वेलर्सचे सौरभ बब्बर कर्जबाजारी झाले होते, त्यामुळे त्यांनी पत्नी मोना सह हरिद्वारच्या गंगा नदीमध्ये उडी घेतली.
गंगा नदीमध्ये उडी मारायच्या आधी सौरभ यांनी पत्नीसोबत सेल्फीही घेतला. तसंच हा सेल्फी त्यांनी मित्रांना व्हॉट्सऍपवरही पाठवला आणि मग गंगेमध्ये उडी मारली. कर्ज खूप झालं आहे त्यामुळे दोघं जीव देत आहोत, असं सौरभ बब्बर यांनी पत्रामध्ये लिहिलं आहे. दरम्यान पोलिसांना सौरभ बब्बर यांचा मृतदेह आढळला असून मोनाचा शोध लागलेला नाही.
सौरभ बब्बर यांचं सहारनपूरच्या किशनपुरा भागात साई ज्वेलर्स नावाचं दुकान आहे. हरिद्वारच्या रानीपूर भागात गंगा नदीमध्ये सौरभ यांचा मृतदेह मिळाला आहे. सौरभ यांच्या मृतदेहासोबतच एक चिठ्ठीही मिळाली आहे, ज्यात कर्जबाजारीपणाला कंटाळून आपण हे पाऊल उचलत असल्याचं त्यांनी लिहिलं आहे.
सौरभ बब्बर मागच्या काही दिवसांपासून गायब होते. सहारनपूरमध्ये ते गोल्ड कमिटी नावाने ओळखलं जात होतं. आज सकाळी त्यांचं पार्थिव सापडल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सौरभ बब्बर यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये 10 ऑगस्ट ही तारीख लिहिण्यात आली आहे. तर सेल्फीमध्ये कॅमेरा टाईम 10 ऑगस्ट 2024 आणि 1 वाजून 23 मिनिटं दाखवत आहे. आम्ही आमच्या कर्जदारांना अंदाधुंद व्याज दिले आहे आणि आता आम्ही आणखी पैसे देऊ शकत नाही. आम्ही दोन्ही मुलांना आजीकडे ठेवून जात आहे, आमचा कुणावरही विश्वास नाही, असं सौरभ यांनी चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.