पोटात गॅस, कॅन्सरचा धोका? अॅसिडीटीवरची गोळी करेल जिवाचा घात?
बदलत्या जीवनशैलीमुळे आजारांचं प्रमाणही वाढलंय. 10 पैकी किमान 7 लोकांमध्ये अॅसिडीटी, गॅस, पोटात जळजळ होणं असे आजार पाहायला मिळतायेत. अॅसिडीटी, जळजळ झाली की अनेकजण लगेचच मेडिकलमधून गोळी घेतात.
मात्र याच गोळ्या-औषधांवरून एक धक्कादायक मेसेज व्हायरल होतोय. अॅसिडीटीवरच्या गोळ्या वारंवार घेतल्यानं कॅन्सरसारखा आजार होऊ शकतो असा दावा या मेसेजमधून करण्यात आलाय.
व्हायरल मेसेजमध्ये काय म्हंटलंय ?
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGIनं रेनिटिडीन गोळीबाबत धोक्याचा इशारा दिलाय. या गोळीत घातक तत्व आढळून आली आहेत. या गोळीचं वारंवार सेवन केल्यास कॅन्सरसारखा गंभीर आजार होऊ शकतो. अॅसिडीटी, जळजळ झाल्यानंतर अनेकजण गोळी घेतात. मात्र या मेसेजमुळे
गोळ्या-औषधांबाबत अनेकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय. खरंच अशा औषधांमुळे
कॅन्सर होऊ शकतो का? साम टीव्हीनं यामागचं सत्य शोधण्याचा प्रयत्न केला.
व्हायरल सत्य
अॅसिडिटी, गॅस, पोटात जळजळ झाल्यास रेनिटिडीन टॅबलेट प्रभावी मानली जाते. WHOनं या गोळीला आपल्या महत्वाच्या औषधांच्या यादीत टाकलंय. मात्र DCGIनं रेनिटिडीन टॅबलेटबाबत धोक्याचा इशारा दिलाय. या टॅबलेटमध्ये कॅन्सर सारखा गंभीर आजार पसरवणारे घटक असल्याचं DCGI नं म्हंटलंय. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वारंवार या गोळ्या घेणं हानीकारक आहेत. या टॅबलेटमध्ये NDMAनावाचा घटक असतो. जो कॅन्सर पसरण्यास कारणीभूत ठरू शकतो.त्यामुळे आमच्या पडताळणीत अॅसिडिटीवरच्या रेनिटिडीन टॅबलेटमुळे कॅन्सरचा धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय. मेडिकल क्षेत्रातल्या अनेक नामांकित कंपन्यांकडून रेनिटिडीन टॅबलेटची निर्मिती केली जाते. बाजारात या गोळीचे 180हून अधिक व्हर्जन आहेत. त्यामुळे या गोळीचं सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.