सांगलीः शहरातील सिव्हिल हॉस्पीटल समोरील गणेशनगर परिसरात मोठ्या प्रमाणात
हॉस्पीटल्स,पॅथॉलॉजी लॅब चे प्रमाण वाढल्याने या भागातील वाहतूक समस्या आणि
अस्वच्छतेबाबत या भागातील नागरीकांनी एका बैठकीत तक्रारीचा पाढाच
प्रशासनापुढे वाचला. प्रशासनाने नागरीकांच्या तक्रारीबाबत कडक भूमिका घेत
या भागातील सर्व रुग्णालयांना नोटीसा बाजवण्याचे आदेश दिले. रुग्णालय
प्रशासनाने याबाबत कार्यवाही न केल्यास परवाने रद्दचा इशारा दिला आहे.
सिव्हिल हॉस्पीटल समोरील गणेशनगर परिसरातील गल्ल्यांमध्ये रहिवासी भागात
खासगी दवाखाने, पॅथॉलॉजी लॅबची संख्या वाढली आहे,यामुळे नागरीकांनी वारंवार
तक्रारी प्रशासनाकडे केल्या होत्या. या प्रभागाचे नगरसेवक मंगेश चव्हाण
यांच्याकडेही नागरीकांनी तक्रारी केल्या होत्या. मंगेश चव्हाण यांनीही
महापालिका प्रशासनाकडे लेखी तक्रार करुन बैठक लावण्याबाबत मागणी केली
होती.
याबाबत काल प्रभाग समिती दोनच्या कार्यालयात अधिकारी,माजी नगरसेवक,
नागरीक,खासगी रुग्णालयाचे प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीस सहाय्यक
आयुक्त विद्या सानप,स्वच्छता अधिकारी डॉ.रविंद्र ताटे,प्रभागाचे माजी
नगरसेवक मंगेश चव्हाण, फिरोज पठाण यांच्या उपस्थितीत नागरीक,प्रतिनिधींची
बैठक झाली. या बैठकीत नागरीकांच्यावतीने नगरसेवक मंगेश चव्हाण यांनी
गणेशनगर भागात रहिवासी क्षेत्र असतानाही या भागात मोठ्या प्रमाणात
हॉस्पीटल्स,पॅथॉलॉजी लॅब आहेत. यामुळे नागरीकांना वाहतूक समस्या आणि
अस्वच्छता समस्येला तोंड द्यावे लागत आहे, यामुळे या भागातील नागरीकांचे
आरोग्यही धोक्यात आले आहे. खासगी रुग्णालयाची पार्किग व्यवस्था
नाही,येणार्या नातेवाईकांसाठी व्यवस्था नाही,अस्वच्छता वाढली आहे. याचा
नागरीकांना त्रास होतो आहे. प्रशासन याबाबत कोणतीच कार्यवाही करताना दिसत
नाही.
या बैठकीत नागरिकांनी गणेश नगर गल्ली क्र 1 येथे उपचार साठी आलेले रुग्ण, नातेवाईक वाहन पार्किंग रस्त्यावरच करीत असल्याने नागरिकांना नाहक त्रास होत असल्याबाबत नागरीकांकडून तक्रारी करण्यात आल्या. तसेच वैद्यकीय उपचार घेण्यासाठी आलेले नागरिक रस्त्यावरच खाऊचे साहित्य, फळे, नारळ कोठेही टाकत आहेत, त्यामुळे अस्वच्छतेमुळे घाणीचे प्रमाण वाढले आहे. उपचारासाठी आलेले नागरिक उघड्यावरच मावा, तंबाखू ,गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकून अस्वच्छता करत असलेल्या बाबत नागरिकांना याचा खूप त्रास होत असल्याबाबतच्या तक्रारी मांडल्या.तक्रारींची दखल घेऊन वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ रविंद्र ताटे , सहा. आयुक्त विद्या सानप-घुगे यांनी तक्रारीची दखल घेत प्रशासकीय पातळीवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले. या भागातील खासगी रुग्णालयांनी रहिवासी भागात पार्किग व्यवस्था पहावी,स्वतंत्र डस्टबीन ठेवावे, याबाबत रुग्णालयांना नोटीसा बजावण्यात येणार आहे. यावेळी शाखा अभियंता विपुल केरीपाळे , युनूस मंगळवारे अतिक्रमण विशेष कार्यकारी अधिकारी दिलीप घोरपडे व प्रभाग समिती क्रमांक 2 चे सर्व स्वच्छता निरीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.