Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या बैठकीत विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी

Breaking News! भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या बैठकीत विनोद तावडेंवर मोठी जबाबदारी
 

भाजच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी राजधानी दिल्लीत महत्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत महाराष्ट्रातील नेत्यांवर महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे.

या पार्श्वभूमीवर विविध घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र भाजपचे नेते विनोद तावडे यांच्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मोठी जबाबदारी दिली आहे. भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदी विनोद तावडे यांची निवड करण्यात आली आहे. विनोद तावडे यांच्यावर आणखी एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात भाजपचा पक्ष विस्तारासाठी भर असल्याचं दिसत आहे. त्याची महत्वाची जबाबदारी विनोद तावडेंवर देण्यात आली आहे.

विनोद तावडेंवर महत्वाची जबाबदारी

आजपासून भाजप सदस्यता नोंदणी अभियान सुरू करत आहे, याची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर देण्यात आली आहे. भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. या बैठकीत तावडेंवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानाच्या प्रमुखपदी विनोद तावडे यांची निवड करण्यात आली आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण?
भाजपचे सध्याचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपत आला आहे. शिवाय केंद्रीय मंत्रिमंडळातही त्यांचा समावेश झाला आहे. त्यामुळे भाजपच्या अध्यक्षपदी आता कुणाची निवड होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबतची निवड प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे. आज भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक होतेय. अमित शाह, राजनाथ सिंह, जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत ही बैठक होत आहे. बैठकीच्या समारोपावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. यावेळी ते भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

भाजपची आज सदस्यता अभियानासंदर्भात बैठक होत आहे. या बैठकीला चार राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना हजर राहण्याबाबत सूट देण्यात आली आहे. महाराष्ट्र, हरयाणा, जम्मू-काश्मीर आणि झारखंड राज्यातील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना गैरहजर राहता येणार आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आजच्या बैठकीला दिल्लीत सहभागी होणार नाहीत. इतर प्रभारी मात्र आजच्या बैठकीत सहभागी आहेत, अशी माहिती आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.