Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

खोटारडे आहेत माझे वडील :, Elon Musk च्या ट्रान्सजेंडर मुलीचे गंभीर आरोप

खोटारडे आहेत माझे वडील :, Elon Musk च्या ट्रान्सजेंडर मुलीचे गंभीर आरोप
 
 

टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलन मस्क आणि त्यांची विभक्त झालेली ट्रान्सजेंडर मुलगी विवियन जेना विल्सन यांच्यातील वाद थांबायचे नावच घेत नाहीयेत. विवियन जेना विल्सनने पुन्हा एकदा एलन मस्क यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.

विवियनच्या मते 53 वर्षीय एलोन मस्क कायमच खोटे बोलतात. ते नेहमीच काल्पनिक जगात जगत असतात, असे तिने म्हटले आहे.

एलन मस्क यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या पाचही मुलांबद्दल एक पोस्ट शेअर केली होती. माझी पाचही मुलं खुप खूश आणि आनंदी आहेत, असे त्या पोस्टवर त्यांनी लिहिले होते. या पोस्टवर विवियन जेना विल्सनने आपली प्रतिक्रिया दिली. मस्क नेहमीच आपल्या काल्पनिक दुनियेत असतात. ते नेहमी माझ्याबद्दल खोटे बोलतात. मी माझ्या मुलांची किती काळजी घेतो, असे ते नेहमी दर्शवत राहतात. मात्र हे सगळे खोटे आहे. तुम्ही आमच्याबद्दल सोशल मीडियावर, मुलाखतीत आणखी किती खोटे बोलणार आहात? असा सवाल विवियनने मस्क यांना केला.

गेल्या महिन्यात एलन मस्कने एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी आपली ट्रान्सजेंडर मुलगी विवियन जेना विल्सनबद्दल काही गोष्टी उघड केल्या होत्या. माझ्या मुलाने लिंगबदलाची शस्त्रक्रिया केली आणि मी माझा मुलगा गमावला. ट्रान्सजेंडर शस्त्रक्रिया केल्यानंतर Xaviar ने आपले नाव आणि आडनाव बदवून विवियन जेना विल्सन असे केले होते, असे मस्क म्हणाले होते. मात्र मस्क यांचे हे वक्तव्यही विवियन जेना विल्सनला आवडले नव्हते.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.