S*X साठी पत्नीच घेऊ लागली नवऱ्याकडून पैसे :, कोर्टात गेलं प्रकरण! कोर्ट म्हणालं,' दोघामधील....'
घटस्फोट ही हल्ली फार सामान्य बाब झाली आहे. केवळ भारतात नाही तर जगभरामध्ये हा ट्रेण्ड दिसत आहे. बरं यासाठी काही ठोस कारणं आवश्यक असतात असंही नाही. तैवानमध्ये असेच एक फारच विचित्र प्रकरण समोर आलं आहे. येथील एका पुरुषाला कोर्टाने घटस्फोट मंजूर केला आहे. या पुरुषाची पत्नी त्याच्याबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणि साधा संवाद साधण्यासाठीही चक्क पैसे आकारत होती. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने पतीला घटस्फोट मंजूर केला आहे.
एकदा शरीरसंबंध ठेवण्यासाठी पत्नी घ्यायची इतके पैसे
हाओ असं घटस्फोट मंजूर झालेल्या पुरुषाचं नावं असून त्याच्या पत्नीचं नाव हुआन असं आहे. हुआनने आपल्या पतीबरोबर शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणि साधं बोलण्यासाठीही पैसे घेण्यास सुरुवात केलेली. हाओने कोर्टासमोर हे पुराव्यासहीत सिद्ध करुन दाखवलं. हाओ आणि हुआनचं लग्न 2014 साली झालं आहे. या दोघांना दोन मुलं आहेत. मागील वर्षभरामध्ये या दोघांमधील मतभेद कमालीचे वाढले. लग्नानंतर सात वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये हाओने घटस्फोटासाठी पहिल्यांदा अर्ज केल्याचं वृत्त साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलं आहे. आपल्या अर्जामध्ये हाओने पत्नी हुआन दरवेळेस माझ्याबरोबर बोलण्यासाठी आणि शरीरसंबंध ठेवण्यासाठी 15 अमेरिकी डॉलर्स (म्हणजेच भारतीय चलनानुसार 1200 रुपये) घ्यायची असा दावा केला. मात्र खटला दाखल करण्यात आल्यानंतर पत्नीने आपण यापुढे असं करणार नाही असा शब्द दिल्यानंतर हाओने खटला मागे घेतला.
दोन वर्ष एकमेकांबरोबर मेसेजनेच चर्चा
पत्नीच्या शब्दांवर विश्वास ठेऊन हाओने आपली संपत्ती आणि घर पत्नीच्या नावे केले. मात्र त्यानंतर पुन्हा या दोघांमधील नातं रसातळाला गेलं. हुआनने पतीबरोबर शररीसंबंध ठेवण्यास नकार देत संवादही बंद केला. मानसिक धक्का बसल्याने हाओने पुन्हा घटस्फोटासाठी अर्ज केला. मागील दोन वर्षांपासून आम्ही एकमेकांशीही बोललेलो नाही. दोघेही केवळ मेसेजिंग अॅप्लिकेशनच्या माध्यमातून बोलतो असं हाओने कोर्टाला सांगितलं. दोघांनाही अनेकदा मॅरेज काऊन्सरलचा सल्ला घेतला. मात्र दोघांमधील नातं काही सुधारलं नाही.
कोर्टाने घटस्फोट मंजूर करताना काय म्हटलं?
तैवानमधील कोर्टाने दोघांना वेगळं होण्यासाठी संमती देत घटस्फोट मंजूर केला आहे. 'दोघांमधील संबंध कमालीचे ताणले गेले असून ते सुधारण्याची शक्यता नाही,' असं म्हणत घटस्फोट मंजूर करण्यात आलं. मात्र पत्नी हुआनने घटस्फोट घेण्यास नकार देत उच्च न्यायालयामध्ये अर्ज केला आहे. मात्र तिचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. तैवानमध्ये असाप्रकारची अनेक जोडपी असल्याचं स्थानिक प्रसारमाध्यमांचं म्हणणं आहे.
सर्वाधिक घटस्फोट होणाऱ्या देशांपैकी एक
आशियामधील घटस्फोटाचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या देशांमध्ये तैवानचा समावेश होतो. याच देशातील एका प्रकरणामध्ये पत्नीने पतीबरोबर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी, जेवणासाठी आणि संवाद साधण्यासाठीही पैसे घेण्यास सुरुवात केली. ती पतीकडून 60 अमेरिकी डॉलर्स घेत होती. हे पाहून या दोघांच्या मुलांनाही वडिलांबरोबर संवाद साधण्यासाठी पैसे आकारण्यास सुरुवात केलेली. या प्रकरणाची सध्याच्या हाओ आणि हुआनच्या प्रकरणामुळे पुन्हा चर्चा आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.