बाप आणि लेकीचं लग्न VIDEO व्हायरल; लोक म्हणाले, कारवाई करा!
लखनऊ : उत्तर प्रदेशमधून बाप-लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. त्या ठिकाणी एका व्यक्तीने आपल्या पोटच्या मुलीशी लग्न केल्याची लाजिरवाणी घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या बापाने मुलीशी लग्न करण्याचं कारणही सांगितलं आहे.
एका मुलीच्या वडिलांचा विचित्र निर्णय
पंकज तिवारी नावाच्या या माणसाला त्याच्या मुलीशी लग्न करण्याचं कारण विचारण्यात आले. तेव्हा त्याने लग्नाचं कारण खूप विचित्र सांगितलं. आपल्याकडे दुसरा पर्याय नव्हता, त्यामुळे मुलीशी लग्न केलं, असं तो म्हणाला. त्याने सांगितलं, की त्याच्या आयुष्यात दुसरं कोणी नाही, त्यामुळे त्याने आपल्या मुलीचं लग्न करून तिला दुसरीकडे पाठवण्याऐवजी तिच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्याचं हे बोलणं ऐकून लोकांना धक्का बसला आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये लग्नाचे विधी
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये पंकज आणि अर्पित तिवारी यांच्या लग्नाचे पारंपरिक विधी पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लोक या संपूर्ण प्रकारावर चिंता व्यक्त करत आहेत.
बाप-लेकीच्या लग्नावर लोकांच्या प्रतिक्रिया
हा झाल्यापासून समाजातल्या विविध नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. लोक हे लग्न कायद्याच्या विरोधात मानत आहेत आणि पंकज तिवारीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत. अशा घटनांमधून समाजाची विचारसरणी आणि कमकुवतपणा समोर येतो, असं एक्स्पर्ट म्हणत आहेत.
कायदेशीर कारवाईची मागणी
या घटनेनंतर पंकज व अर्पित तिवारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं आहे. या प्रकरणी बाप-लेक दोषी आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं.
बाप-लेकीचं लग्न; समाजासमोर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर समाजासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे राहिले आहेत. अशा प्रकरणांकडे दुर्लक्ष करता येईल का? अशा घटनांविरोधात कडक कायदे व्हायला हवेत की नाही? समाजात नैतिकता आणि कायद्याचं पालन करणं किती महत्त्वाचं आहे याचा विचार करायला ही घटना लोकांना भाग पाडते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.