खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन आणि Whats up हॅक
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन हॅक करण्यात आला आहे. सुप्रिया सुळे यांनीच यासंदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावरील 'एक्स' साईटवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की, 'माझा फोन आणि व्हॉटस्अप हॅक झाले आहे. कोणीही मला मेसेज किंवा फोन करून नये. याबाबत मी पोलीस तक्रार करत आहे. कृपया याची नोंद घ्यावी'. असे आवाहन त्यांनी केले आहे. आज दुपारी १ वाजताच्या सुमारास पोस्ट करत सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना आणि जनतेला याबाबतची माहिती दिली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.