Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

साताऱ्यात शरद पवारांची 007 नंबरच्या कारमधून एन्ट्री!

साताऱ्यात शरद पवारांची 007 नंबरच्या कारमधून एन्ट्री!
 

साताऱ्यात 007 नंबरची गाडी म्हटलं की आठवण येते ती भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची. मात्र, आज (22) सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची साताऱ्यातील बालेकिल्ल्यात 007 च्या कारमधून एन्ट्री झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

शरद पवार जेव्हा जेव्हा सातारा दौऱ्यावर येतात तेव्हा त्यांची एक खास गाडी त्यांच्या स्वागतासाठी तयारीत असते. मात्र, आज त्यांना 007 या नंबरच्या कारची विशेष सोय करण्यात आली होती. ही कार कराडमधून खास मागवण्यात आली आहे. आज दिवसभर शरद पवार याच कारमधून सर्वत्र प्रवास करणार आहेत.

दरम्यान, शरद पवार आज कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांसाठी सातारा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राजकीय वर्तुळाचे सुद्धा लक्ष आहे. शरद पवार विधानसभेसाठी इच्छुक असलेल्यांशी चर्चा करणार आहेत. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती सोहळ्यानिमित्त महाराजा सयाजीराव विद्यालयाच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी शरद पवार उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यानंतर प्राथमिक शिक्षक बँकेच्या शताब्दीमहोत्सवी सोहळ्याला उपस्थिती राहणार आहेत. त्यानंतर पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. दुपारी कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे निवासस्थानी ते भेट देणार आहेत. या ठिकाणी आगामी निवडणुकीसाठी चर्चा होण्याची शक्यता आहे. सायंकाळी रयत शिक्षण संस्थेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पवारांच्या हस्ते होणार आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.