सांगली : जिल्ह्यात 137 मंडळांना डीजे पडला महागात
सांगली : गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे, तसेच लेसर लाईटचा वापर करणे मंडळांना चांगलेत महागात पडले आहे. डीजेचा वापर करून आवाजाची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी जिल्ह्यातील 137 गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले, तर लेसर लाईटप्रकरणी 10 मंडळांवर कारवाई करण्यात आली.
यंदाचा गणेशोत्सव डीजे व लेसरमुक्त करण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले होते. गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद हे सण एकाचवेळी आल्याने पोलिसांनी खबरदारी घेतली होती. जिल्हा, उपविभागीय आणि पोलिस ठाण्याच्या स्तरावर बैठका घेण्यात आल्या. जिल्ह्यात गणेश मंडळांच्या 317, मूर्तिकार 24, शांतता समिती 54, मोहल्ला कमिटी 30, पोलिसमित्र यांच्या 44 बैठका झाल्या. याशिवाय 28 ठिकाणी दंगा काबू प्रात्यक्षिक केले, तसेच 44 रूटमार्च काढण्यात आले.
पोलिस ठाणेरीडिंग घेतलेखटले
मिरज शहर 106 11जिल्ह्यात 79 गावांनी एक गाव एक गणपती उपक्रम राबविला, तर 5473 मंडळांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. 2 लाख 55 हजार घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गणेशोत्सवात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्तही तैनात केला होता. या कालावधीत मागील दहा वर्षांतील दाखल गुन्ह्यांतील 1404 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली होती. यंदाचा गणेशोत्सव डीजेमुक्त, लेसरमुक्त करण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. लेसरच्या वापरावर जिल्हाधिकार्यांनी बंदी आदेशही लागू केला होता. तरीही अनेक गणेश मंडळांनी डीजेचा वापर केलाच. पोलिसांनी जिल्ह्यातील 313 गणेश मंडळांच्या डीजेचे ध्वनिमापन यंत्राद्वारे रीडिंग घेतले. त्यातील 137 मंडळांनी आवाजाची मर्यादा ओलांडल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार या मंडळांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तसेच लेसर व प्लाझ्मा लाईटचा वापर केल्याबद्दल 10 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
मिरज ग्रामीण 41 17
महात्मा गांधी 9 7
सांगली शहर 30 30
सांगली ग्रामीण 5 5
संजयनगर 12 12
विश्रामबाग 30 30
जत 25 4
भिलवडी 7 3
पलूस 13 13
शिराळा 15 4
इस्लामपूर 1 1
शहरात वाढला डीजेचा आवाज
शहरातील बहुतांश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत डीजे लावला होता. काही मंडळांनी आवाजाची मर्यादा पाळली, तर काहींनी डीजेचा दणदणाट केला. पोलिसांच्या कारवाईवरून शहरात डीजेचा आवाज वाढल्याचे दिसून येते. विशेषतः सांगली शहर, विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत सर्वाधिक 30 मंडळांवर खटले दाखल केले आहेत. त्यानंतर मिरज शहर, ग्रामीण व संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत डीजेचा आवाज ऐकू आला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.