Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

वीज कोसळून 6 विद्यार्थ्यांसह 8 जणांचा मृत्यू; शाळेतून घरी जाताना पावसामुळे झाडाखाली थांबले अन् गमावला जीव

वीज कोसळून 6 विद्यार्थ्यांसह 8 जणांचा मृत्यू; शाळेतून घरी जाताना पावसामुळे झाडाखाली थांबले अन् गमावला जीव
 

रायपूर : मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून महाराष्ट्रासह अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मोठ्या विश्रांतीनंतर वीजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावलीय. दरम्यान, छत्तीसगढमध्ये वीज कोसळून ६ मुलांसह ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

शाळेतून मुलं घरी परतत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला. तेव्हा पावसात भिजू नये म्हणून मुलं एका पान दुकानाजवळ उभी राहिली. यावेळी वीजेचा कडकडाट झाला आणि जिथे मुलं उभी होती तिथंच वीज कोसळली. यात ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
वीज कोसळून ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षकांसह जिल्हा शिक्षण अधिकारीसुद्धा घटनास्थळी दाखल झाले. या घटनेत एक व्यक्ती होरपळली आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत. माहिती मिळताच आरोग्य विभागाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. राजनांदगावचे जिल्हाधिकारी संजय अग्रवाल यांनी सांगितलं की, जोरातराई गावात मुसळधार पावसावेळी वीज कोसळली. यावेळी शाळेतून घरी येणारे विद्यार्थी आणि काही लोक एका पानशॉप जवळ झाडाखाली थांबले होते. तेव्हा त्यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत ६ मुलांसह ८ जणांचा मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सर्वजण झाडाखाली उभे होते आणि अचानक वीज कोसळली. यात सर्वजण होरपळले होते. घटनेची माहिती मिळताच डॉक्टरांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यात जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्यावर उपचार केले जात आहेत.
जांजगीर चांपा जिल्ह्यात एक दिवस आधी वीज कोसळून एका ११ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला होता. तर ८ जण जखमी झाले होते. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. तरुण आणि मुलं गावातील तलावाजवळ पिकनिकसाठी गेले होते. त्यावेळी अचानक पावसाला सुरुवात झाल्याने ते आंब्याच्या झाडाखाली उभे होते. तेव्हा वीज झाडावर कोसळली.


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.