खालापूर तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिले म्हणून निर्दयी मुलीने जन्मदात्या आईलाच संपवल्याची घटना परखंदे अहिल्यानगर गावात घडली आहे.
संगीता मारुती झोरे असे मयत महिलेचे नाव आहे.
मयत संगीता या आपल्या दोन मुलींसह परखंदे अहिल्यानगर गावात राहत होत्या. मंगळवारी पहाटे साडेचारच्या सुमारास संगीता यांना झोपेतून जाग आली. यावेळी संगीता यांना त्यांची मोठी मुलगी भारती ही तिचा प्रियकर संतोष नांदगावकर याच्यासोबत नको त्या अवस्थेत दिसली.
संगीता यांनी आरडाओरडा करण्यास सुरवात केली. यावेळी संतोषने त्यांचे तोंड दाबून त्यांना जमिनीवर खाली पाडले. त्यानंतर संगीताच्या तोंडावर घरातील ब्लँकेट दाबून धरले. तर भारतीने आईचे पाय पकडले. श्वास कोंडल्याने संगीता यांचा मृत्यू झाला.
संगीता यांची हत्या झाल्याचे लपवण्यासाठी आरोपींनी साडीने घराच्या छताच्या लोखंडी पाईपला मृतदेह लटकवला. तसेच पायाजवळ लाकडी स्टूल ठेवून हत्येला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला. घटना घडली तेव्हा संगीता यांची लहान मुलगीही तेथे उपस्थित होती. लहान मुलीने सर्व घडला प्रकार नातेवाईकांना सांगितला. यानंतर ही हत्येची घटना उघडकीस आली.नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार खालापूर पोलीस ठाण्यात भारती झोरे आणि तिचा प्रियकर संतोष नांदगावकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. अधिक तपास खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार करत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.