पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना झटका!! सरकारचा राजीनामा
पश्चिम बंगाल मध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.
काही दिवसांपूर्वी कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ जवाहर सरकार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या संपूर्ण घटनेबाबत तृणमूल काँग्रेसच्या भूमिकेबाबतच शंका उपस्थित करत जवाहर सरकार यांनी नाराजी व्यक्त केली.
जवाहर सरकार यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्रही लिहिले आहे. आपल्या पत्रात त्यांनी म्हंटल, 'मला वाटत होते की तुम्ही आरजी कार हॉस्पिटलमधील क्रूरतेबाबत काही मोठे पाऊल उचलाल. जुन्या ममता बॅनर्जींच्या धर्तीवर तुम्ही यावर कारवाई करण्याची तयारी कराल. पण तुम्ही कोणतेही पाऊल उचलले नाही. आता तुम्ही जे पाऊल उचलले आहे त्याला खूप उशीर झाला आहे. आता तरी राज्यात शांतता प्रस्थापित झाली पाहिजे आणि दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी सरकार यांनी केली.ते पुढे म्हणाले, या भयानक घटनेनंतर मला खूप वाईट वाटले. मला आशा होती की ममता बॅनर्जी त्यांच्या जुन्या शैलीत आंदोलक ज्युनियर डॉक्टरांच्या प्रकरणात हस्तक्षेप करतील, परंतु असे काहीही झाले नाही. कोलकाता येथे होत असलेले आंदोलन हे काही मर्जीतील लोकांच्या आणि भ्रष्ट लोकांच्या अनियंत्रित दबंग वृत्तीविरुद्धच्या जनक्षोभाचे प्रतिबिंब आहे. या निदर्शनाने संपूर्ण बंगाल हादरला आहे. राज्यातील आंदोलक तरुण-तरणींना राजकारण नको, तर न्याय हवा आहे. हे आंदोलन जितके महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरांसाठी आहे तितकेच राज्य सरकारचे आहे. त्यासाठी सरकारने तातडीने सुधारणा करणे आवश्यक आहे, अन्यथा जातीयवादी शक्ती या राज्याचा ताबा घेतील अशी भीती सुद्धा जवाहर सरकार यांनी व्यक्त केली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.