तापाने फणफणलेल्या चिमुरडीवर बलात्कार, डॉक्टरला अटक
उत्तर प्रदेशातील आग्रामधल्या एका निवासी डॉक्टरला अटक करण्यात आली आहे. या डॉक्टरवर 11 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप आहे. सरोजिनी नायडू मेडिकल कॉलेजमध्ये तापाने फणफणलेल्या 11 वर्षांच्या मुलीला दाखल करण्यात आले होते.
या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मेडिकल कॉलेज प्रशासनाने 28 वर्षांच्या दिलशाद हुसेन याला निलंबित केले आहे. दिलशादविरोधात तीन चौकशी समित्या नेमण्यात आल्या आहेत. पोलिसांनी सदर प्रकरणी माहिती देताना म्हटले की, गुरुवारी मदन मोहन गेट पोलीस ठाण्यात एक तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे दिलशादला अटक करण्यात आली आहे. पीडितेला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले असून सदर प्रकरणातील अधिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू झाले आहे.
मेडिकल कॉलेजचे मुख्याध्यापक डॉ.प्रशांत कुमार यांनी सांगितले की आरोपी हा बालकांसाठीच्या कक्षामध्ये नियुक्त करण्यात आला होता. बलात्काराचे प्रकरण आमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले आणि त्याला पोलिसांच्या हवाली करण्यात आले. आरोपीविरोधात शिस्तपालन, विभागीय आणि अंतर्गत चौकशी समिती नेमण्यात आली आहे. याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल.
सदर प्रकरणात दाखल झालेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पीडिता ही 11 वर्षांची असून ती तापाने फणफणलेली होती. ज्यामुळे तिला उपचारासाठी या रुग्णालयात आणण्यात आले होते.. 6 तारखेला या मुलीला अतिदक्षता विभागात दाखल केले गेले आणि नंतर तिला लहान मुलांच्या वॉर्डमध्ये आणण्यात आले होते. पीडितेच्या आईने म्हटलंय की 10 सप्टेंबर रोजी आरोपीने वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली लैंगिक छळ केला.
बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरचे गुप्तांग छाटले
बिहारच्या पाटण्यामध्ये डॉक्टरने त्याच्यासोबत हॉस्पीटलमध्ये काम करणाऱ्या नर्सवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी नर्सने चवळच पडलेल्या ब्ले़डने डॉक्टरचे गुप्तांग छाटून टाकत तिथून पळ काढला पोलिसांनी या प्रकरणी डॉक्टरसह तिघांना अटक केली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की डॉक्टर आणि त्याचे दोन साथीदार दारू पिऊन आले होते. या तिघांनी मिळून 25 वर्षांच्या नर्सवर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. नर्सने स्वत:चा बचाव करताना ब्लेड उचलले आणि डॉक्टरचे गुप्तांग छाटून टाकले. यानंतर तिने हॉस्पीटलचा दरवाजा बाहेरून बंद करत तिथून पळ काढला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.