जबरदस्तीने गर्भपात करून मागासवर्गीय असल्याचं कारण देत लग्नास नकार; पुण्यातील धक्कादायक घटना
लग्नाचे अमिष दाखवून दोन वर्षांपासून एका तरूणीवर वारंवार बलात्कार केला. मात्र ती गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीने तिचा गर्भपात करून पीडित मुलगी मागासवर्गीय असल्याचे सांगत लग्नास नकार दिल्याची घटना पुण्यात घडली आहे.
ही घटना पुण्यातील लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संयोग संजय गायकवाड, (वय २४, रा. माळीमळा, पार्टी सेलीब्रिया हॉल समोर, लोणी काळभोर ता. हवेली) असे आरोपीचे नाव असून याप्रकरणी एका १९ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.
फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, संयोग गायकवाड याचे पीडित तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यातूनच त्याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर 2022 पासून अनेकदा लैंगिक अत्याचार केले. काही वेळा तिला लॉजवर नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तर सीसीटीव्ही कॅमेरा असलेल्या दुकानांमध्ये सुद्धा बलात्कार करण्यात आला. दोन वर्ष हा अत्याच्यावर ही तरुणी गर्भवती राहिली.त्यानंतर गायकवाड याने तरुणीला धमकावून जबरदस्तीने ती दहा आठवडे पंधरा दिवसांची गरोदर असताना तिचा गर्भपात केला. हा गर्भपात उरुळी कांचन मधील एका खाजगी रुग्णालयात करण्यात आला. त्यानंतर या तरुणाने 'आपली जात वेगळी आहे, तू मागासवर्गीय आहेस', असं म्हणत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर तरुणाच्या या अत्याचारानंतर पीडितेने लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठून गायकवाड विरोधात तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने पुढील तपास लोणी काळभोर पोलिसांकडून सुरू आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.