भर बाजारात पत्नीला पेट्रोल ओतून जाळलं; मालवणमधील थरकाप उडवणारी घटना
देशभरात महिला अत्याचाराच्या भयंकर घटना घडत आहेत. दोन दिवसांपूर्वी बेंगळोरमध्ये एका तरुणीची निर्घृणपणे हत्या करुन मृतदेहाचे तुकडे करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती.
या घटना ताज्या असतानाच आता मालवणमध्ये पतीने भर बाजारात पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, महिलांवरील अत्याचाराच्या घटना ताज्या असतानाच मालवणमध्ये पहिल्या पतीने पत्नीला पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची घटना घडली आहे. यामध्ये महिलेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. प्रिती केळुस्कर (वय, ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. तर सुशांत गोवेकर असे आरोपी पतीचे नाव असून सध्या तो फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
बुधवार (ता. २५ सप्टेंबर) सायंकाळच्या सुमारास मालवण एसटी बसस्थानक परिसरात ही भयंकर घटना घडली. समोर आलेल्या माहितीनुसार, प्रीती केळुस्कर या एका शॉपमध्ये काम करतात. काल सायंकाळच्या सुमारास पतीने भर बाजारात येऊन त्यांच्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला, यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. घटनेनंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचार सुरू असतानाच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.