भाजप जिंकले तर ईद आणि मोहरमला दोन सिलेंडर फ्री, अमित शहा यांची घोषणा
भाजप जिंकले तर ईद आणि मोहरमला दोन सिलेंडर फ्री देण्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये मेंढर येथे शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी ही घोषणा केली.
जम्मू-काश्मीरमध्ये अब्दुल्ला, मुफ्ती आणि नेहरू-गांधी परिवाराने 90 च्या दशकापासून आतापर्यंत दहशतवाद पसरवला आहे. मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधून दहशतवाद संपवला आहे. येथील तरुणांना दगडांऐवजी लॅपटॉप दिला आहे. या निवडणुकांमुळे अब्दुल्ला कुटुंब, मुफ्ती कुटुंब आणि नेहरू-गांधी घराणे यांची राजवट संपुष्टात येणार आहे, असेही अमित शहा आपल्या भाषणात म्हणाले.
2014 मध्ये मोदीजींचे सरकार आले नसते तर पंचायत, ब्लॉक आणि जिल्ह्याच्या निवडणुका झाल्या नसत्या. मोदी सरकारमध्ये ओबीसी, मागासवर्गीय, गुर्जर बकरवाल, डोंगरे यांना आरक्षण मिळाले. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स म्हणतात की आम्ही आरक्षण संपवू, पण भाजप म्हणत आहे की आम्ही गुर्जर बकरवाल आणि पहाडींनाही बढतीत आरक्षण देऊ, असे आश्वासनही अमित शहा यांनी सभेत बोलताना दिले. महिलांच्या खात्यात 18 हजार रुपये येणार आहेत. तर ईदला 2 सिलिंडर दिले जाणार आहेत. याशिवाय आम्ही 500 युनिट्स मोफत देऊ, असेही अमित शहा यांनी पुढे नमूद केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.