झेड प्लस सुरक्षा घेतो पण 'या' अटी पूर्ण करा; शरद पवारांचे केंद्र सरकारला पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना देण्यात येणाऱ्या केंद्राच्या सुरक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. सुरक्षा घेण्याआधी शरद पवारांनी केंद्रापुढे काही अटी ठेवल्या आहेत. शरद पवारांच्या प्रतिनिधीची केंद्राच्या अधिकाऱ्यांसोबत दिल्लीत बैठक पार पडली आहे. या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
शरद पवारांनी केंद्रासमोर ठेवल्यात पुढील अटी
- केंद्राच्या सुरक्षेआधी राज्याचे सुरक्षा कर्मचारी माझ्यासोबत असणार
- कार्यालयात आणि निवासस्थानाच्या आत केंद्राच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार
- शिवाय स्वतःच्या खाजगी वाहनात सुरक्षा कर्मचाऱ्यांना प्रवेश नसणार
यासह काही अटी शर्थीचे पत्र शरद पवारांकडून केंद्राला सादर करण्यात आल्याची माहिती आहे.या अटी मान्य केल्यावर पवारांकडून केंद्राची सुरक्षा घेण्याचा विचार केला जाणार आहे. केंद्र सरकारकडून शरद पवारांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
शरद पवारांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा प्रस्ताव केंद्राच्या गृह विभागानं मांडला होता. पण, शरद पवारांनी झेड प्लस सुरक्षा नाकारली आहे. गाडी बदलणे, गाडीत सुरक्षा रक्षक ठेवणे, निवासस्थानाच्या आत सुरक्षारक्षक असू देणे याला शरद पवार यांनी नकार दिला होता. यासंदर्भात गृह विभागाला कळवण्यात आलं होतं.
शरद पवारांची सुरक्षा का वाढवण्यात येते याबाबत कारण गुलदस्त्यात होते. गृह विभागाने देखील याबाबत काही माहिती दिली नव्हती. त्यामुळे शरद पवारांकडून सुरक्षा नाकारण्यात आली होती. शरद पवारांच्या सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. सुप्रिया सुळे यांनी देखील सुरक्षा व्यवस्था काढून टाकण्याची विनंती केली होती.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.