Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

Breaking News! सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता दरमहा किती?

Breaking News! सरपंच-उपसरपंचाच्या मानधनात दुप्पटीने वाढ; राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता दरमहा किती?
 

मुंबई : राज्यातील सरपंच  आणि उपसरपंचासाठी एक महत्वपूर्ण बातमी समोर आली आहे. सरपंच आणि उपसरपंच यांच्या मानधन दुप्पट करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याला मंजुरी देण्यात आली आहे.

ग्रामविकास विभागाने नुकतंच याबद्दलची माहिती दिली आहे. सोबतच ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे एकच पद करण्यात आले असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली आहे. ग्रामपंचायती वार्षिक उत्पन्न 75 हजार आहे, त्यांना 10 लाखांपर्यंत करण्यात आले आहे. तेसच ग्रामीण गृहनिर्माण योजनेतील अधिकारी, कर्मचारी यांच्या मानधनमध्ये देखील वाढ करण्यात आली असून ही वाढ 20 टक्के इतकी ही वाढ करण्यात आली आहे. अशी माहिती भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन  यांनी दिली आहे.

आता दरमहा किती मानधन ?
राज्यातील सरपंच आणि उपसरपंचाच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. या बाबत अधिक माहिती देताना भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, आज कॅबिनेटमध्ये राज्यातील सरपंच आणि उपसरपंच यांचे मानधन दुप्पट करण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2 हजार पर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन 3 हजारवरुन 6 सहाहजार करण्यात आले आहे. तर उपसरंपचाचे मानधन हे 1 हजारवरुन 2 हजार करण्यात आले आहे.

तसेच ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या 2 हजार ते 8 हजारपर्यंत आहे त्या सरपंचाचे मानधन 4 हजारवरुन 8 हजार तर उपसरपंचाचे मानधन पंधराशेवरुन 3 हजार रुपये इतके करण्यात आले आहे. ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या 8000 पेक्षा जास्त आहे त्या सरपंचाचे मानधन 5 हजारवरुन 10 हजार, तर उपसरपंचाचे मानधन 2 हजारवरुन 4 हजार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या मानधनवाढीमुळे राज्यशासनावर वार्षिक 116 कोटी रुपयांचा आर्थीक भार येणार असल्याचे माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन  यांनी दिली आहे. तर राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असतानाच मंत्रिमंडळ बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याने राज्यातील सरपंच आणि उपसरपंचामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.