तळीरामानों सावधान! दारूमुळे एक दोन नव्हे तर 'या' 6 प्रकारच्या कॅन्सरने व्हाल त्रस्त
तुम्ही सुद्धा रोज दारू पितात का? जर या प्रश्नाचे उत्तर होय असे असेल तर आजच ही सवय नाहीशी करण्याचा प्रयत्न करा. याचे कारण म्हणजे रोज दार पिणाऱ्यांना एक दोन नव्हे तर तब्बल 6 घातक कॅन्सर होण्याचा धोका असतो.
ज्यामुळे फक्त तुम्ही नाही तर तुमच्या कुटुंबाला सुद्धा याचा त्रास होऊ शकतो. अमेरिकन असोसिएशन फॉर कॅन्सर रिसर्च (AACR) च्या 2024 कॅन्सर प्रोग्रेस रिपोर्टनुसार, कमी-अधिक प्रमाणात मद्यपान केल्याने विविध प्रकारच्या कॅन्सरचा धोका वाढतो. हे नवीन संशोधन असे सूचित करते की दारूचे सेवन सर्व कॅन्सरच्या प्रकरणांशी 5% पेक्षा जास्त जोडलेले आहे. लठ्ठपणा आणि सिगारेट नंतर, दारू हे घातक कॅन्सरचा धोका वाढवण्याचे तिसरे कारण आहे. अशा परिस्थितीत दारूपासून दूर राहणेच शहाणपणाचे आहे.
आपण नेहमी ऐकत आलो आहे की दारू पिणे हे वाईट असते. कित्येकांचे तर घरं या दारूने उध्वस्त केले आहेत. पण तरीही कित्येक जण रोज दारू पिताना आढळतात. चला आज आपण, दारूच्या सेवनामुळे होणाऱ्या 6 कॅन्सरबद्दल जाणून घेऊया.
1. ब्रेन कॅन्सर (Brain Cancer)2. मानेचा कॅन्सर (Neck Cancer)3. एसोफेजल स्क्वॅमस सेल कार्सिनोमा (Esophageal Squamous Cell Carcinoma)4. ब्रेस्ट कॅन्सर (Breast Cancer)5. कोलोरेक्टल कॅन्सर (Colorectal Cancers)6. यकृत आणि पोटाचा कॅन्सर (Liver and Stomach Cancers)
AACR अहवालात असेही म्हटले आहे की जर एखाद्याने दारू पिणे बंद केले तर संबंधित कॅन्सरचा धोका 8% कमी केला जाऊ शकतो आणि सर्व प्रकारच्या कॅन्सरचा धोका 4% कमी केला जाऊ शकतो. तज्ज्ञांच्या मते, वारंवार दारू प्यायल्याने त्याचा अनेक अवयवांवर परिणाम होतो. दारू एखाद्या विषासारखे कार्य करत असल्याने, शरीर हळूहळू धोकादायक आणि जीवघेण्या रोगांचे घर बनते.
AACR अहवाल दर्शवितो की 51% अमेरिकन लोकांना माहिती नाही की दारू प्यायल्याने कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे कित्येक सर्रास दारू पित असतात. परंतु लोकांना दारूच्या धोक्यांबद्दल सावध करणे आवश्यक आहे. लोकांनाही यापासून दूर राहावे लागेल, अन्यथा आरोग्याच्या अनेक गंभीर समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे जीवही गमवावा लागू शकतो.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.