Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार

करवाचौथला सासरी जाणाऱ्या महिला पोलिसावर गावाबाहेर अत्याचार
 

कानपूरमध्ये करवाचौथच्या दिवशी धक्कादायक घटना घडली आहे. करावचौथ साजरे करण्यासाठी शहरातील ड्युटीवरून सासरी जात असताना गावाबाहेरच महिला पोलिसावर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलातही खळबळ उडाली आहे.

महिला कॉन्स्टेबल रात्री उशिराने सासरी येत होती. तेव्हा गावाबाहेरच असताना एका तरुणाने तिला जबरदस्तीने पकडले व शेजारच्या शेतात नेत बलात्कार केला. यावेळी तिने विरोध केला असता तिचा दात तोडण्यात आला आहे. महिला पोलिसाने अखेरचा प्रयत्न म्हणून आरडाओरडा केला, यामुळे घाबरून नराधम पसार झाला. पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.

कानपूरच्या सेन पश्चिम पारा भागात ही महिला राहते. तिची अयोध्येमध्ये पोस्टिंग आहे. करवाचौथ साजरे करण्यासाठी शनिवारी ती अयोध्येहून कानपूरला आली होती. तिथून ती गावी जात होती. बसने तिला मुख्य रस्त्यावर उतरविले. तिथून तिला गावात पायी जायचे होते. महिला पोलीस साध्या कपड्यांमध्ये होती. गावाच्या आधीच असलेल्या निर्मनुष्य जागी एका तरुणाने तिला अडविले आणि पकडून शेतात नेले. तिथे तिचे कपडे फाडून तिच्यावर बलात्कार केला.

यावेळी महिला पोलिसाने त्याच्या बोटाचा जोरात चावा घेतला. यात तिचा दात तुटला. तिने ओरडायला सुरुवात करताच आजुबाजुला जवळपासच्या भागातील घरांत झोपलेले लोक जागे झाले. यामुळे तरुणाने तिथून पलायन केले. महिला पोलिसाने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी धर्मेंद्र नावाच्या आरोपीला अटक केली आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.