Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर, ४८ नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी? वाचा...

काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी जाहीर, ४८ नावांची घोषणा, कुणाला कुठून संधी? वाचा...
 

मुंबई : महाविकास आघाडीतील घटकपक्ष राष्ट्रवादी (शरद पवार) आणि शिवसेना (ठाकरे) यांच्याशी जागा वाटपासंबंधी अनेक बैठका पार पडल्यानंतर, तिन्ही पक्षांच्या समन्वयातून अंतिम समीकरण ठरल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसने गुरुवारी ४८ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. काँग्रेस पक्षाने पहिल्या उमेदवारी यादीत अपेक्षप्रमाणे विद्यमान आमदारांना स्थान दिलेले आहे. तर वादाच्या जागांवर लगोलग उमेदवार जाहीर करणे टाळले आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षाने परंरागत साकोली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना संगमनेर मतदारसंघातून, ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना कराड विधानसभा मतदारसंघातून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना चिमूर विधानसभा मतदारसंघातून तसेच ज्येष्ठ नेते संग्राम थोपटे यांना भोर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.

गेली अनेक दिवस शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागा वाटपावरून जोरदार तंटा सुरू होता. विशेषत: विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवर दोन्ही पक्षांत खेचाखेची सुरू होती. काँग्रेसचे नेते आणि नाना पटोले यांच्यात तर काही जागांवरून अक्षरश: शाब्दिक युद्ध झाले. त्यामुळे जागावाटपाच्या अनेक बैठका पार पडूनही अंतिम समीकरण निश्चित होत नव्हते. महाविकास आघाडी तुटतेय की काय? अशा चर्चाही यामुळे झाल्या. अशा सर्व कारणांमुळे अखेर काँग्रेसच्या शीर्षस्थ नेतृत्वाला मध्यस्थी करावी लागली. त्यांनी महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावून घेतले. 
 
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी चेन्नीथला आदी नेत्यांसोबत चर्चा करून एकएक जागेवर चर्चा करून उमेदवारांची निश्चिती केली. शिवसेना नेतृत्वाशी चर्चा करण्याची जबाबदारी काँग्रेसने ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर सोपवली. थोरात यांच्या शिष्टाईला यश आल्याने अखेर काँग्रेसने गुरुवारी पहिली उमेदवार यादी जाहीर केली.

१) बाळासाहेब थोरात-संगमनेर
२) नाना पटोले-साकोली
३) विजय वडेट्टीवार-ब्रह्मपुरी चिमूर
४) पृथ्वीराज चव्हाण-कराड
५) नितीन राऊत-नागपूर उत्तर
६) विश्वजीत कदम-पलूस कडेगाव
७) सुनील केदार-सावनेर
८) अमित देशमुख-लातूर ग्रामीण
९) अस्लम शेख-मालाड पश्चिम
१०) अमीन पटेल-मुंबादेवी
११) केसी पाडवी-अक्कलकुवा
१२) यशोमती ठाकूर-तिवसा
१३) संग्राम थोपटे-भोर
१४) संजय जगताप-पुरंदर
१५) लहू कानडे-श्रीरामपूर
१६) कुणाल पाटील-धुळे ग्रामीण
१७) अमिक झनक-रिसोड
१८) धीरज देशमुख-लातूर ग्रामीण
१९) ऋतुराज पाटील- कोल्हापूर दक्षिण
२०) जयश्री जाधव-कोल्हापूर उत्तर
२१) पी एन पाटील-करवीर
२२) कैलास गोरंट्याल-जालना
२३) विक्रम सावंत- जत
२४) शिरीष नाईक-नवापूर
२५) राजेश एकाडे-मलकापूर
२६) रणजीत कांबळे- देवळी
२७) सुरेश वर्पूरडकर-पाथरी
२८) सुरेश कोपरकर-भांडूप पश्चिम
२९) सहस्राम कोरोटे-आमगाव
३०) नसीम खान-चांदिवली
३१) डॉ. ज्योती गायकवाड- धारावी
३२) राजेंद्र गावित-शहादा
३३) किरण तडवी- नंदूरबार
काँग्रेसने उमेदवार निश्चित केले असले तरी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष किती जागांवर लढणार हे अजून स्पष्ट झालेले नाही. विदर्भ आणि मुंबई विभागात दोन्ही पक्षांत किती जागांवर समेट घडून आला आहे, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.