Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

मेरे खून का कतरा कतरा

मेरे खून का कतरा कतरा
 

काळ किती क्रूर आहे. बघता-बघता ४० वर्षे झाली. ४० वर्षांपूर्वी ओडिसा येथील भाषणात इंदिराजींचे शब्द होते, 'मै आज जीवित हूँ... कल शायद नहीं रहूंगी... लेकीन मेरे खून का कतरा कतरा देश की एकता कायम रखने को काम आएगा..'

३० ॲाक्टोबरचे ते भाषण... ३१ ॲाक्टोबरला ९.३० वाजता पंतप्रधान निवासस्थानातून बाहेर पडताना घाईघाईत संरक्षक चिलखत घालायला विसरून त्या घराबाहेर पडल्या आणि अवघ्या दहा सेकंदात त्यांच्या देहाची चाळण झाली. 
 
त्यांच्या बलिदानानंतर आपल्याच मनाला आपण विचारूया... 'देशाची एकात्मता आणि सर्वधर्मसमभाव आपण जपला की, व्यक्तीगत स्वार्थ, केवळ सत्ता आणि सत्ता, त्यासाठी जाती-धर्माचा वापर, धार्मिक उन्माद... आपण नेमके कुठे चाललो आहोत...? महात्माजींची गोळी घालून हत्या करणारे महात्माजींना मारू शकले... पण त्यांचे विचार मारू शकले नाहीत. इंदिराजींना मारल्यानंतर त्यांच्या बलिदानाशी हा देश तेवढाच प्रामाणिक राहिला आहे का? मनाला अस्वस्थ करणारे हे प्रश्न आज प्रत्येक भारतीयांच्या मनात येतील पण, त्याची उत्तर मिळू शकतील का? इंदिराजींच्या स्मृतींना विनम्र अभिवादन!
 
- मधुकर भावे

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.