सीमा तपासणी नाक्यांवर अलर्ट रहा : उपायुक्त विजय चिंचाळकर
राज्य उत्पादन शुल्कच्या महाराष्ट्र-गोवा-कर्नाटकातील अधिकाऱ्यांची समन्वय बैठक
कोल्हापूर :
महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तपासणी नाक्यासह सीमावर्ती भागात सतर्क रहावे अशा सूचना राज्य उत्पादन शुल्कचे कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर यांनी दिल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पाश्वर्भूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक सीमेवरील अधिकाऱ्यांची बैठक कोल्हापूर येथे आयोजित केली होती. त्यावेळी उपायुक्त श्री. चिंचाळकर यांनी निवडणुकीच्या अनुषंगाने सीमा भागात करावयाची कारवाई आणि दक्षता याबाबत तीनही राज्यातील अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी या निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी तीनही राज्यातील सीमावर्ती भागातील अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून अवैध मद्य तस्करीवर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या.
या बैठकीला कर्नाटक राज्य उत्पादन शुल्कच्या बेळगावी उत्तर, बेळगावी साऊथ, विजापूरचे उपायुक्त, उत्तर गोव्याचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे अधीक्षक तसेच निरीक्षक उपस्थित होते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.