आईची हत्या करून शरीराचे लचके तोडणाऱ्या आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे. या प्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. यावेळी मुंबई हायकोर्टाने आरोपीची फाशीची शिक्षा कायम ठेवली.
ही घटना दुर्मिळातील दुर्मिळ असल्याने शिक्षा कायम ठेवली आहे. “आरोपी सुनील कोंचीकोरवीने केलेला गुन्हा अत्यंत गंभीर तो सुधारण्यासारखा नाही, त्यामुळे आरोपी समाजात राहू शकत नाही”, असं निरीक्षण यावेळी मुंबई हायकोर्टाने नोंदवलं. आरोपी सुनील कुंचीकोरवीने जन्मदात्या आईची दारूच्या पैशांसाठी हत्या केली होती. आरोपी तेवढ्यावरच थांबला नव्हता तर त्याने आपल्या आईच्या शरीराचे लचके तोडत ते शिजवून खालले देखील होते. कोल्हापुरातल्या माकडावाला परिसरात २८ ऑगस्ट २०१७ ला ही भयंकर घटना घडली होती. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने ८ जुलै २०२१ लाआरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. हायकोर्टाने तीच शिक्षा आता कायम ठेवली आहे. या प्रकरणी आता आरोपीला 30 दिवसात सुप्रीम कोर्टात जाण्यास मुभा आहे.
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर मुंबई हायकोर्टात आज सुनावणी पार पडली. सुनावणी वेळी आरोपी सुनील हा पुण्याच्या येरवाडा जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होतो. संबंधित प्रकरण हे नरभक्षणाचं प्रकरण असल्याचं कोर्टाने म्हटलं. त्यामुळे आरोपीला सुधारणा करण्यासाठी वाव नाही. तो सुधारण्यासारखा नाही, असं कोर्टाने म्हटलं आहे. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ आहे आणि आरोपीला जन्मठेपाची शिक्षा दिली तरी तो जेलमध्ये राहूनही असा गुन्हा करु शकतो, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं. कारण आरोपीने स्वत:च्या आईची हत्या करुन तिचा मेंदू, लीवर आणि इतर अवयवांना शिजवून खाल्लं होतं. आरोपीने आपल्या आईच्या बरगड्या शिजवल्या होत्या आणि तिचं हृदयही तो शिजवणार होता. हे नरभक्षणाचं प्रकरण आहे. आरोपीत सुधारण्याची कोणतीही शक्यता नाही, असंही कोर्टाने नमूद केलं.
नेमकं प्रकरण काय?
आरोपी सुनील कोंचीकोरवी याची आई फुगे आणि कंगवे विकून उदरनिर्वाह भागवायची. तिला राजू आणि सुनील असे दोन मुलं होती. सुनील हा लहान मुलगा होता. त्याला दारुचं व्यसन होतं. घटनेच्या दिवशी आई रात्री 10 वाजता घरी आली तेव्हा सुनीलने तिच्याकडे पैशांची मागणी केली. आईने नकार दिल्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी आरोपी सुनील याने आपल्या आईवर चाकूने हल्ला केला. यानंतर त्याने तिच्या शरीराचे तुकडे करत लचके तोडले.घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या लोकांनी तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा आरोपी त्याच्या आईच्या हृदयाला शिजवणार होता. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्याकडे असणारा चाकूही जप्त केला. याप्रकरणी तब्बल 12 जणांनी साक्ष दिली तेव्हा त्याला शिक्षा सुनावण्यात आली.संबंधित घटना ही 28 ऑगस्ट 2017 मध्ये घडली होती. आरोपीने आपल्या 63 वर्षाच्या आईची हत्या करत तिच्या शरीराचे अवयव शिजवले आणि ते खाल्ले देखील होते. या प्रकरणी कोल्हापूर सत्र न्यायालयाने 2021 मध्ये आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आता मुंबई हायकोर्टानेदेखील योग्य असल्याचं ठरवलं आहे.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.