सांगली : सांगली विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस नेत्या जयश्री मदन पाटील यांनी बंडखोरी करत सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेस व अपक्ष असे त्यांचे दोन अर्ज सादर करण्यात आले. यावेळी मदन पाटील यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, सांगली, मिरजेतील समर्थक नगरसेवकांसह कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
सांगली विधानसभेची उमेदवारी न मिळाल्याने भावनांचा उद्रेक झालेल्या जयश्री पाटील यांच्या समर्थकांनी अखेर निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. शनिवार आणि रविवारी दिवसभर विजय बंगला आणि विष्णुअण्णा भवनवर कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. जयश्री पाटील यांनी आमदारकी लढवायचीच, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला होता. यानंतर रविवारी सायंकाळी जयश्री पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. आपणाला गाडणाऱ्यांना गाडायचे आहे, असे जाहीरपणे त्यांनी सांगितले आणि मग अर्ज दाखल करायचा निर्धार करण्यात आला.
सोमवारी सकाळपासूनच विजय बंगल्यावर कार्यकत्यांची गर्दी झाली होती. अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी जयश्री पाटील यांनी कार्यकत्यांशी संवाद साधला. त्यानंतर बारा वाजता कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले आणि अर्ज दाखल करण्यात आला. पी. एल. रजपूत, माजी महापौर किशोर शहा, शिकंदर जमादार, मनोज सरगर, मंगेश चव्हाण, शेवंता वाघमारे, स्वाती सूर्यवंशी, फिरोज पठाण या सूचक व अनुमोदकांनी अर्ज सादर केले.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.