Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

लॉरेन्स बिश्नोईच्या तुरुंगातील मुलाखतीप्रकरणी दोन उपअधीक्षकांसह ७ पोलीस कर्मचारी निलंबित

लॉरेन्स बिश्नोईच्या तुरुंगातील मुलाखतीप्रकरणी दोन उपअधीक्षकांसह ७ पोलीस कर्मचारी निलंबित
 

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई पोलीस कोठडीत असताना घेतलेल्या मुलाखतीच्या चौकशीनंतर पंजाब पोलिसांनी दोन उपअधीक्षक दर्जाच्या एकूण ७ पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित केल्‍याचे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.

विशेष पोलीस महासंचालक (मानवाधिकार) यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाला (एसआयटी) आढळून आले की, लॉरेन्स बिश्नोई खरार, मोहाली येथे पंजाब पोलिसांच्या ताब्यात असताना एक मुलाखत घेण्यात आली आणि दुसरी मुलाखत राजस्थानमधील तुरुंगात असताना घेण्यात आली होती.

तपास पथकाच्या निष्कर्षांनंतर, पंजाबच्या गृहसचिवांनी शुक्रवारी (दि.२५) पोलीस उपअधीक्षक गुरशेर सिंग संधू, पोलीस उपधीक्षकांसह समर वनीत, उपनिरीक्षक रीना (सीआयए खरार), उपनिरीक्षक जगतपाल जंगू, उपनिरीक्षक शगनजीत सिंग, सहायक उपनिरीक्षक यांना निलंबित केल्याची घोषणा केली. इन्स्पेक्टर मुखतियार सिंग आणि हेड कॉन्स्टेबल ओम प्रकाश यांचा देखील निलंबनाच्या यादीत समावेश आहे. या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन वरील सर्व अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

SIT च्या अहवालात स्पष्टपणे सूचित करण्यात आले आहे की, बिश्नोई यांची मुलाखत 3 आणि 4 सप्टेंबर 2022 च्या रात्री व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली होती. मार्चच्या सुरुवातीला एका खासगी वृत्तवाहिनीने बिश्नोई यांच्या दोन मुलाखती प्रसारित केल्या होत्या, ही पहिली क्राइम इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (CIA) च्या आवारातून होती. खररमधील कर्मचारी, मोहालीच्या एसएएस नगरच्या अखत्यारीतील आणि दुसरा जयपूर मध्यवर्ती कारागृहातील मुलाखती असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.