Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

धक्कादायक! गुणवत्ता चाचणीत नापास ठरली तब्बल ४९ औषधे! तुम्ही तर खात नाही ना? पाहा यादी

धक्कादायक! गुणवत्ता चाचणीत नापास ठरली तब्बल ४९ औषधे! तुम्ही तर खात नाही ना? पाहा यादी
 

केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेने काही औषधांची तपासणी केली. यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. सीडीएससीओने गुणवत्ता चाचणीत काही औषध निकृष्ट ठरवली आहेत. सप्टेंबर महिन्यात ही औषधांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जवळजवळ दर महिन्याला सीएसडीओ त्यांच्या वेबसाइटवर गुणवत्ता चाचणीत फेल ठरलेल्या औषधांची यादी जाहीर करते. यात कॅल्शियम, अँटासिडसह ४९ औषधांचा समावेश आहे.

पुण्यातील हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड पिंपरीपासून तयार करण्यात आलेली मेट्रोनिडाझोलही या यादीत टाकण्यात आले आहे. याशिवाय डोम्पेरिडोन, ऑक्सिटोसिन इंजेक्शन, निमेसुलाइड आणि पॅरासिटामॉल गोळ्या, कॅल्शियम ५०० मिलीग्राम आणि व्हिटॅमिन डी ३ २५० आययू टॅब्लेट आयपी, लोपेरामाइड हायड्रोक्लोराइड गोळ्या, ग्लिमेपिराइड टॅब्लेट, पॅरासिटामॉल पेडियाट्रिक ओरल सस्पेंशन आयपी टॅब्लेट आणि इतर अनेक औषधांचा या यादीत समावेश आहे.

सीडीएससीओ यादीतील इतर औषधांमध्ये पिपरासिलिन आणि टॅझोबॅक्टॅम इंजेक्शन, मेथिलकोबालामिन इंजेक्शन २५०० एमसीजी (नुरोफेन्स २५०० इंजेक्शन), डेक्सट्रोमेथॉर्फन ए हायड्रोब्रोमाइड, क्लोरफेनिरामाइन ई मॅलेट आणि फेनिलेफ्रिन हायड्रोक्लोराइड सिरप यांचा समावेश आहे. याशिवाय सेटिरिझिन डायहायड्रोक्लोराईड सिरप (सिट्रिझप) हे देखील गुणवत्ता यादीत फेल ठरलेल्या औषधांच्या यादीत आहे.

त्याचप्रमाणे गेल्या महिन्यात सीडीएससीओने तापावर वापरल्या जाणाऱ्या पॅरासिटामॉलसह ५२ औषधांची यादी जाहीर केली होती. त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, अँटी डायबेटिस आदी औषधांच्या नावांचाही समावेश होता.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.