Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

काँग्रेसमध्ये खळबळ! तिकिट जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच मोठ्या नेत्याने माघारी केली उमेदवारी

काँग्रेसमध्ये खळबळ! तिकिट जाहीर झाल्यानंतर काही मिनिटांतच मोठ्या नेत्याने माघारी केली उमेदवारी
 

राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यासाठी राज्यातील सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अशात काँग्रेस पक्षाने काल रात्री 16 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. मात्र, ही तिसरी यादी जाहीर केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी माघारी घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

 

एक्सवर पोस्ट लिहीत सचिन सावंत म्हणाले, "मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो."


 


➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.