धक्कादायक ! मिटिंग सुरू असताना महावितरणच्या अभियंत्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
हिंगोली : कामाच्या अती तणावामुळे पुण्यात एका सीए तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. आता हिंगोलीमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरण कार्यालयामध्ये सहाय्यक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मीटिंग सुरू असताना सहाय्यक अभियंत्याला अचानक हार्ट अटॅक आला. यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
काय घडले नेमके?
सचिन कोळपे असं मयत सहाय्यक अभियंत्याचं नाव आहे. हिंगोली महावितरण कार्यालयामध्ये महावितरणची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज दुपारी बैठक सुरू होती. सचिन दत्तात्रेय कोळपे हे सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत होते. ते मूळचे नांदेडचे रहिवासी आहेत. मीटिंग सुरू असताना अचानक खुर्चीवरून पडले. सचिन कोळपे अचानक खूर्चीवरून खाली कोसळल्यामुळे एकच खळबळ उडाली. सहकाऱ्यांनी सचिन कोळपे यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
सचिन कोळपे यांचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. यावेळी बोलताना नातेवाईकांनी वरिष्ठांच्या त्रासामुळे, त्यानी धमकी दिल्यामुळेच हा मृत्यू झाल्याचा आरोप केला. वरिष्ठांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांच्या नातेवाईकांनी घेतला. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली. चौकशी करून पुढील योग्य ती कारवाई करू, असं आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर घरच्यांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.