Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

सांगली :- विट्यात अल्पवयीन मुलीचा धावत्या टेम्पोत विनयभंग, तरुणास अटक

सांगली :- विट्यात अल्पवयीन मुलीचा धावत्या टेम्पोत विनयभंग, तरुणास अटक
 

टेम्पोतून विटा येथून कुंडलकडे जाताना एका अल्पवयीन मुलीचा टेम्पोतच विनयभंग केला. हा प्रकार शनिवारी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास विटा - कुंडल रस्त्यावरील सूर्यनगर येथे घडला. याची विचारणा करण्यास गेलेल्या मुलीच्या वडिलांवरही संशयिताने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी संशयित परशुराम सिदराम होनमोरे (वय ३३, रा. कुंडल, ता. पलूस, जि. सांगली) यास विटा पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित अल्पवयीन मुलगी संशयित परशुराम होनमोरे याच्या टेम्पो (क्र. एमएच ४३ पीपी ४१६६)मधून विटा येथून कुंडलकडे जात होती. टेम्पो विटा ते कुंडल रोडवर सूर्यनगर येथे पोहचल्यानंतर संशयित परशुराम याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. तिने त्यास प्रतिकार केला.

हा प्रकार तिने घरी आल्यावर वडिलांना सांगितला. त्यावेळी वडिलांनी या प्रकाराची संशयित परशुरामकडे विचारणा केली. त्यावेळी वडिलांना शिवीगाळ करून कोयता घेऊन परशुराम त्यांच्या अंगावर धावला. धमकी देत वडिलांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या आईसोबत विटा पोलिस ठाण्यात संशयित परशुराम होनमोरे याच्याविरूद्ध फिर्याद दिली. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता ७५ (१), ३५२, ३५१ (२) (३) पोक्सो ८ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली. पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक जयश्री कांबळे पुढील तपास करीत आहेत.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.