खळबळजनक! महिला शिक्षिकेला बुटाने मारण्याची धमकी, अर्वाच्च भाषेत केली शिवीगाळ; मंगळवेढ्यातील मुख्याध्यापकाविरुध्द गुन्हा दाखल
नगरपालिका शाळेतील मुलास तुम्ही अपशब्द वापरुन का बोलला ? असे एका शिक्षिकेने विचारल्याच्या कारणावरुन बुटाने मारण्याची धमकी देवून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरपालिका शाळेचे मुख्याध्यापक सतिश नारायण आवताडे यांच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी या नगरपालिका कन्या शाळा नं.२ मध्ये शिक्षिका असून इयत्ता तिसरील विद्यार्थी चिखलामध्ये पाय भरवून वर्गामध्ये येत असताना फिर्यादीने त्यास पाय धू असे सांगितले असता त्याने त्याचे वर्गातील बाटलीतील पाण्याने पाय धूतला मात्र तो स्वच्छ न झाल्याने जवळ असलेल्या नगरपालिका शाळा नं. १ मध्ये त्याने हौदावर जावून पाय धुतले.
सदरचा प्रकार नगरपालिका मुलींची शाळा नं. १ चे प्रभारी मुख्याध्यापक सतिश नारायण आवताडे यांनी पाहिला व शाळेच्या बाहेर येवून त्या विदयार्थ्यास बोलावून दर्डावत तु तुझ्या शिक्षकाच्या मांडीवर बसून पाय धूवून घे असे अर्वाच्च भाषेत म्हणत ते निघून गेले.दि.१८ रोजी दुपारी २.४५ वाजता फिर्यादी व सोबतचे शिक्षक निंगाप्पा कोळी, सुवर्णा आवताडे, भारती नागणे असे सर्वजण शाळेसमोर असताना आरोपीही तेथे होते.दि.१७ रोजी सदर मुलास तुम्ही अपशब्द वापरुन का बोलला ? असे विचारले असता तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही, तुम्ही मध्ये बोलू नका,अशी एकेरी भाषा फिर्यादीस वापरुन तु येथून निघून जा नाही तर पायातील बुट काढून मारीन, त्याचबरोबर खालच्या पातळीवर येवून अपशब्द उच्चारुन नालायक कुत्रे असे म्हणून शिवीगाळी केली.यावेळी सोबतच्या शिक्षकांनी फिर्यादीस शाळेत नेले. घडला प्रकार नगरपालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी अर्चना जनबंधू यांना सांगितला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून याचा अधिक तपास मंगळवेढा शहर पोलीस करीत आहेत.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.