नात्याला काळिमा! पुणे जिल्ह्यात मामाने चिमुकल्या भाचीवर केला अत्याचार.
पुणे जिल्ह्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण गावातील दवणेवस्ती येथे मामाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चाकण औद्योगिक क्षेत्रातील आंबेठाण येथे रहात्या घरात आई सोबत झोपलेल्या 4 वर्षीय भाचीला झोपत उचलून निर्जनस्थळी नेऊन अत्याचार करण्यात करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे.
मामाने सख्ख्या चार वर्षीय भाचीवर अत्याचार केला आहे. मनिषकुमार सिंग असे अत्याचार करणा-या मामाचे नाव आहे. पीडित मुलीचे कुटुंब बिहार येथील रहिवाशी आहेत. पीडित मुलीचे वडिल एका खासगी कंपनीत कामाला गेले असताना घरात झोपलेल्या 4 वर्षीय मुलीला तिच्या मामाने उठवून घराबाहेर निर्जनस्थळी नेले. जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार करुन तिकडेच सोडून दिले. या प्रकरणी महाळुंगे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
डीसीपी शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘माळुंगे एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सकाळी एका चार वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. त्यानंतर तात्काळ पोलीस स्टेशन अंमलदार त्याठिकाणी पोहोचले. प्राथमिक चौकशी केल्यानंतर संशयित आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे. संशयित मुलीचा नातेवाईकच आहे. सख्खा मामा आरोपी असल्याचे निष्पन्न झाले आहे. पीडीत मुलीच्या आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास करत आहोत.’
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.