लाडक्या बहिणींना मिळणार मोफत मोबाईल? जाणून घ्या सत्यता
महाराष्ट्र सरकारने यावर्षी महिलांसाठी अनेक योजना आणलेल्या आहेत. त्यातील महत्त्वाचे आणि चर्चेत असलेली योजना म्हणजे माझी लाडकी बहीण योजना. या योजनेची सरकारने जुलै महिन्यामध्ये सुरुवात केलेली होती.
त्यानंतर महिलांना आतापर्यंत तीन हप्त्याचे पैसे आलेले आहेत. त्याचप्रमाणे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत. म्हणजेच या योजनेअंतर्गत आतापर्यंत महिलांना पाच हप्ते जमा झालेले आहेत. आणि अशातच आता लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठे अपडेट समोर आलेले आहे.
सध्या सोशल मीडियावर एक मेसेज चांगलाच व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये या योजनेअंतर्गत आता महिलांना मोफत मोबाईल फोन मिळणार असल्याचा दावा केला जात आहे. लाडक्या बहिणी योजनांना मोबाईल गिफ्ट देणार असल्यासचा कंटेंट देखील व्हायरल होत आहे. परंतु या व्हायरल व्हिडिओ मागचा नक्की सत्य काय आहे. याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
महिलांना या योजनेच्या माध्यमातून मोबाईल फोन देण्याची चर्चा सुरू आहे. अशी माहिती या व्हिडिओ मधून समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये महिलांना मोबाईल साठी अर्ज करावे लागतील. असे देखील सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे जवळपास लाखो महिला यास बळी पडू शकतात. लाडक्या बहिणी योजनेचा फायदा काही स्त्रियांना होत असला, तरी या योजनेच्या माध्यमातून भ्रष्टाचार होत असल्याचा माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही असे अर्ज भरले, तर तुमचे पैसे जाण्याचा प्रकार देखील घडू शकतो. या मेसेजमुळे सोशल मीडियावर देखील चांगलाच गोंधळ उडताना दिसत आहे. परंतु सरकारच्या वतीने कोणत्याही प्रकारचा मोबाईल गिफ्ट देण्याचे आश्वासन देण्यात आलेले नाही. तसेच सरकारने या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती चालू केलेली नसली, तरी सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा मेसेज फेक असल्याचे सांगण्यात आलेले आहे
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.