काँग्रेसची दुसरी यादीही आली; कुणाला मिळाली उमेदवारी, कुणाचा पत्ता कट?
महाराष्ट्रात काँग्रेसनं पहिली यादी जाहीर केली आहे. अनेक ठिकाणी तगडे उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. झारखंडमध्येही काँग्रेसनं जोरदार तयारी केली असून, दुसरी यादी जाहीर केली आहे. बरही विधानसभा मतदारसंघातील उमाशंकर अकेला यांचा पत्ता कट झाला आहे. अरुण
साहू यांना उमेदवारी दिली आहे. कांके मतदारसंघात सुरेश कुमार बैठा यांना
मैदानात उतरवलं आहे. आलमगीर यांच्या जागी त्यांची पत्नी निशात आलम यांना
पाकूडमधून उमेदवारी दिली आहे.
विश्रामपूर मतदारसंघातून इंडिया आघाडीचा घटकपक्ष राष्ट्रीय जनता दलानंतर
काँग्रेसनेही आपला उमेदवार रणांगणात उतरवला आहे. तेथून सुधीर कुमार
चंद्रवंशी यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल यांनी
घोषित केलेल्या यादीनुसार, पांकी मतदारसंघात लाल सूरज, डालटनगंज येथून के.
एन. त्रिपाठी आणि छरतपूर येथून राधाकृष्ण किशोर यांना पक्षाकडून अधिकृत
उमेदवारी दिली आहे.
धनबाद आणि बोकारो या मतदारसंघांत काँग्रेसने अद्याप अधिकृत उमेदवार घोषित केलेले नाहीत. डालनगंज येथून के. एन. त्रिपाठी यांनी आधीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पक्षाने २०१९ मध्ये पांकी मतदारसंघातून देवेंद्र सिंह उर्फ बिट्टू सिंह यांना उमेदवारी दिली होती. तर विश्रामपूरमधून चंद्रशेखर दुबे यांना आखाड्यात उतरवलं होतं.
काँग्रेसला झटका
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उमाशंकर अकेला यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. बरही येथून समाजवादी पक्षाकडून निवडणूक लढवणार आहेत. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत ज्येष्ठ नेते उमाशंकर यांच्या राजीनाम्याने काँग्रेसला मोठा फटका बसू शकतो असे मानले जाते.
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.