Breaking News

6/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

भाजपची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळालं विधानसभेचं तिकीट ? तर जत विधानसभा मतदार संघात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी

भाजपची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळालं विधानसभेचं तिकीट ? तर जत विधानसभा मतदार संघात गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी 
 

मुंबई : भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने दुसरी यादी जाहीर करत २२ जणांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने या विधानसभा निवडणुकीत अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा संधी दिल्याचे दिसत आहे. 

भाजपने दुसऱ्या यादीत मुंबईच्या एकही मतदारसंघाचं नाव नाही. भाजपने पुण्यातील तिन्ही जुन्याच चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपने खडकवासला विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली आहे 

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुनील कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर कसबा विधानसभा मतदारसंघातून हेमंत रासने यांना संधी दिली आहे. हेमंत रासने यांनी रवींद्र दंगेकर यांच्या विरोधात पोटनिवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. नाशिकमधील देवयानी फरांदे यांना दुसऱ्या यादीत संधी मिळाली आहे. सांगली जिल्ह्यातील जतमधून विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर सोलापूरमधील राम सातपुते यांचं नाव दुसऱ्या यादीत देखील नाही. तर महायुतीत वाद असलेल्या आष्टी मतदारसंघाचा देखील या यादीत समावेश नाही.

भाजपने अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट दिलं आहे. पेणमधून रवींद्र पाटील (रवीशेठ पाटील) यांनाच उमेदवारी जाहीर झाली आहे. पेणमध्ये रवींद्र पाटील यांचा मुलगा लढणार अशी चर्चा सुरु होती. विक्रमगडमधे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यामुळे विक्रमगडची जागा अजित पवार गटाकडे जाईल, अशी चर्चा सुरु होती. मात्र, विक्रमगडची जागा भाजपच्या वाट्याला आली आहे. विक्रमगड बदल्यात अजित पवार यांच्या पक्षाला कोणती जागा मिळते हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे. तर वाशिम, गडचिरोली येथील विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. त्यांच्या जागेवर आता नव्या चेहऱ्यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे नवीन उमेदवार नाव -
राम भदाणे - धुळे ग्रामीण

प्रकाश भारसाकले - अकोट

विजय अग्रवाल - अकोला पश्चिम

केवलराम काळे - मेळघाट (काँग्रेसचे माजी आमदार)

डॉ. मिलिंद नरोटे - गडचिरोली (विद्यमान आमदाराच तिकीट कापून नव्या उमेदवाराला संधी)

देवराव भोंगळे - राजुरा

कृष्णालाल सहारे - ब्रह्मपुरी

करण देवतळे - वरोरा

हरिश्चंद्र भोये - विक्रमगड

हेमंत रासने - कसबा (पोटनिवडणुकीत पराभव)

रमेश कराड - लातूर ग्रामीण (विधानपरिषद आमदार)

देवेंद्र कोटे - सोलापूर मध्य

सत्याजित देशमुख - शिराळा

गोपीचंद पडळकर - जत (विधानपरिषद आमदार व पूर्वी निवडणूक लढलेले)

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.