🔴 LIVE NEWS

12/recent/ticker-posts

Sangli Darpan

Krushnakath News

कोल्हापूर : १७ वर्षीय युवकाने नैराश्येतून संपविली जीवनयात्रा

कोल्हापूर : १७ वर्षीय युवकाने नैराश्येतून संपविली जीवनयात्रा


चंदगड : मजरे कार्वे येथील एका १७ वर्षीय युवकाने नैराश्येतून राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना रविवारी (दि.१३) दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. प्रयास पांडुरंग पाटील असे या युवकाचे नाव आहे.

प्रयास हा गेल्या दोन दिवसापासून निराश दिसत होता. वडील रोज दारू पिऊन येत असल्याने तो चिंताग्रस्त जीवन जगत होता. त्यानंतर आज (रविवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास नैराश्येतून घरातील स्लॅबच्या हुकाला दोरीने गळफास घेऊन त्याने जीवनयात्रा संपविली. या घटनेची वर्दी त्याचे मामा राजेंद्र निंगाप्पा इंजल यांनी चंदगड पोलिसात दिली.

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.